Darshan Thoogudeepa: कुत्र्याने केला जीवघेणा हल्ला, दाक्षिणात्य सुपरस्टारविरुद्ध महिलेची पोलिसांत तक्रार

दर्शनच्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केल्याचा गंभीर आरोप आहे
Case against actor Darshan Thoogudeepa after his dogs attack on advocate woman
Case against actor Darshan Thoogudeepa after his dogs attack on advocate womanSAKAL
Updated on

Darshan Thoogudeepa News: सध्या भटक्या कुत्र्यांचं सामान्य माणसांना चावण्याचं प्रमाण वाढलंय. पण नुकताच एक पाळीव कुत्रा महिलेला चावल्याने लोकप्रिय अभिनेत्याविरोधात FIR दाखल केलाय.

कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा याच्या पाळीव कुत्र्यांनी चावा घेतल्याचा आरोप महिलेने केला आहे. यानंतर पोलिसांनी दर्शनविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, त्याच्या केअरटेकरसोबत झालेल्या वादानंतर कुत्र्यांनी महिलेवर हल्ला केलाय.

(Case against actor Darshan Thoogudeepa after his dogs attack)

Case against actor Darshan Thoogudeepa after his dogs attack on advocate woman
Jio World Plazaच्या उद्घाटनात भरली बॉलिवूड कलाकारांची जत्रा! ग्लॅमरस लूकने कार्यक्रमात लावले चार चाँद

दर्शन थुगुदीपवर केला आरोप

तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीचे नाव अमिता जिंदाल. अमिता यांनी सांगितले की, ती दर्शनच्या शेजारील एका कार्यक्रमाला गेली होती आणि दर्शनच्या घराशेजारील मोकळ्या जागेत तिने कार पार्क केली होती. कार्यक्रमानंतर ती परत आली तेव्हा तिथल्या जागेत तिला तीन कुत्रे दिसले.

अमिता म्हणाल्या की, पार्किंगच्या जागेवरून श्वानाच्या केअरटेकरसोबत तिचा वाद झाला आणि त्यानंतर कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला चढवला. तिने सांगितले की, सोडलेल्या पहिल्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला आणि घाबरून दुसऱ्या कुत्र्याने तिला चावलं. (Latest Marathi News)

दर्शनाविरुद्ध गुन्हा दाखल

ANI न्यूज एजन्सीनुसार, 'घराजवळील मोकळ्या जागेत कार पार्क करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कुत्र्यांनी चावल्याच्या निष्काळजी वर्तनासाठी अभिनेता दर्शनच्या विरोधात भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 289 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 28 ऑक्टोबर रोजी आरआर (राजराजेश्वरी) नगरमध्ये या अंतर्गत FIR नोंदवण्यात आला आहे. (Latest Entertainment News)

Case against actor Darshan Thoogudeepa after his dogs attack on advocate woman
Shraddha Kapoor: 'आओ हुजूर तुम को' श्रद्धा कपूरनं गायिले आजी आशा भोसले यांचे गाणे! व्हिडिओ व्हायरल

कुत्र्याला हेतुपुरस्सर सोडून दिल्याचा आरोप

महिलेने तिच्या FIR मध्ये म्हटले आहे की, कुत्र्यांचा सांभाळ करणाऱ्या व्यक्तीने कुत्र्यांना तिच्यावर हल्ला करण्यापासुन रोखण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत.

यासोबतच कुत्रे हल्ला करतील हे माहित असुनही त्यांच्यापैकी एका कुत्र्याला आपल्यावर सोडल्याचेही तिने सांगितले. कुत्रा चावल्याने अमिताच्या पोटाला दुखापत झाली. भारतीय दंड संहिता कलम 189 अंतर्गत दर्शन आणि त्याच्या केअरटेकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.