मुंबई : चित्रपट निर्माता जसप्रीत वालीया यांच्या विरोधात सीबीआयने गुन्ह्याची नोंद केली आहे. जसप्रीत वालिया यांनी सिनेमासाठी आयडीबीआय बँकेकडून कर्ज घेत बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा नोंदवला आहे. लम्हा, हॅलो ब्रदर, एक अजनबी, प्यार किया तो डरना क्या अशा सिनेमांची निर्मिती वालिया यांनी केली आहे.
या प्रकरणी वालियांचे चार्टर्ड अकाऊंटंट स्टॅनी सलढाणा यांनी बँकेकडून कर्ज मिळावे, म्हणून बनावट प्रमाणपत्रे दिल्याप्रकरणी त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बँकेने दिलेल्या लेखी तक्रारीवरून सीबीआयने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सिनेमासाठी कर्ज
जून 2008 साली अभिनेता संजय दत्त, बिपाशा बासू, कुणाल कपूर अशी स्टारकास्ट असलेल्या लम्हा सिनेमाची निर्मिती करण्यासाठी वालिया यांच्या जी. एस. एन्टरटेनमेंट कंपनीने आयडीबीआय बँकेकडून परदेशी चलनात 10 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.
हा चित्रपट मे 2009 मध्ये प्रदर्शित होणे अपेक्षित होते. मात्र, त्याला बराच विलंब झाला. या चित्रपटामध्ये बँकेचे पैसे अडकले असल्यामुळे बँकेनेच या सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी पुढाकार घेतला होता. बँकेने दिलेल्या कर्जासाठी निश्चित करण्यात आलेल्या अटी व शर्तींचे कंपनीने पालन न केल्यामुळे बँकेने कंपनीचे फॉरेन्सिक ऑडिट केले. यामधून अनेक धक्कादायक गोष्टी बँकेच्या निदर्शनास आल्या.
फॉरेन्सिक ऑडिटमधील माहिती
या सिनेमाला अधिकाधिक पैसे मिळावेत म्हणून सिनेमाच्या निर्मितीचा खर्च देखील फुगवून दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. निर्मात्याला आयडीबीआय बँकेकडून कर्जापोटी जी रक्कम मिळाली त्यातील पैसे निर्मात्याने अन्य बँकेचे कर्ज फेडण्यासाठी वापरले. तसेच काही पैसे निर्मात्याच्याच अन्य खात्यात वळवून तेच पैसे लम्हा सिनेमासाठी वापरले असल्याचे दाखवण्यात आले, असा ठपका ठेवण्यात आला आहे. फॉरेन्सिक ऑडिट करतेवेळी कंपनीला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी वारंवार विचारणा केली. मात्र, कंपनीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. यानंतर निर्मात्याच्या कंपनीचे खाते 31 मार्च 2021 रोजी आर्थिक गुन्हेगार खाते म्हणून घोषित करण्यात आले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.