ज्या घटनेनं बॉलीवूड (bollywood) हादरून गेलं होतं ती घटना म्हणजे अभिनेत्री जिया खानची (sucide of jiyah khan) आत्महत्या. त्यामुळे बॉलीवूडला मोठा धक्का बसला होता. त्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडं देण्यात आला होता. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून त्यावर कुठल्याही प्रकारची माहिती समोर आली नव्हती. काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये (london) जियावर आधारित एक माहितीपट प्रदर्शित झाल्याची माहिती पुढे आली होती. त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसादही मिळाला होता. आता जियाच्या आत्महत्येचं प्रकरण समोर आलं आहे त्याला कारण म्हणजे सीबीआय कोर्टांन महत्वाची सुनावणी केली आहे. (cbi court to hear jiah khan death case pending for 8 years sooraj pancholi yst88)
एक दोन नव्हे तर तब्बल आठ वर्षांनंतर जिया खानच्या आत्महत्या प्रकरणावर सीबीआय कोर्ट सुनावणी करणार असल्याची बाब पुढे आली आहे. या प्रकरणात अभिनेता सुरज पांचोली हा मुख्य आरोपी आहे. जियाच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास हा मुंबई पोलीस आणि सीबीआयनं केला आहे. त्यातील वेगवेगळ्या प्रकारची माहिती प्रकाशात आली आहे. जियाच्या आत्महत्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासेही आहेत. गेल्या काही वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी ही बंद होती.
सत्र न्यायालय ज्यांनी आरोपी सुरज पांचोलीच्या विरोधात सुनावणी सुरु ठेवली होती त्यांचं असं म्हणणं होतं की, हे प्रकरण सीबीआयच्या विशेष न्यायालयात हस्तांतरित करण्याची गरज आहे. त्यानुसार आता या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. आठ वर्षांनंतर होणाऱ्या सुनावणीतून पुन्हा कुठली नवीन माहिती समोर येणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
3 जुन 2013 रोजी जियानं तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. जियाच्या आत्महत्येवर तिच्या आईनं पोलिसांकडे अशी तक्रार केली होती की, जियानं आत्महत्या नव्हे तर तिची हत्या झाली आहे. याप्रकरणावरुन पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला होता. मात्र त्यात फारशी प्रगती झालेली नाही. अखेर सत्र न्यायालयानं हे प्रकरण सीबीआय कोर्टाकडं दिले आहे. त्याबाबत जियाच्या आईनं समाधान व्यक्त केलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.