सूर्याच्या 'जय भीम' चित्रपटाची जोरदार चर्चा

Jai Bhim Film
Jai Bhim Filmesakal
Updated on

जय भीम! असं कोणी चार चौकात बोललं तर अनेकांचे कान टवकारतात, नजरा बदलतात. अशा काळात 'जय भीम' हे सिनेमाचं टायटल ठेवणंच किती धाडसाचं आहे. तामिळ सुपरस्टार सूर्याची प्रमुख भूमिका असलेला आणि अमेझॉनवर प्रदर्शित झालेला ‘जय भीम’ चित्रपट सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरलाय. सत्य घटनांवर आधारित या चित्रपटाच्या कथानकापासून अभिनय, दिग्दर्शनापर्यंत सर्वच गोष्टींचं कौतुक केलं जातंय. यात सेलिब्रेटीही मागे नाहीत. याशिवाय, आयएमडीबीवरही या चित्रपटाला भारतीय श्रेणीत सर्वाधिक रेटिंग मिळालीय.

चित्रपट निर्माते व्यंकट प्रभू यांनीही हा चित्रपटा पाहून प्रतिक्रिया दिलीय. 'नुकताच अमेझॉन प्राईमवर जय भीम चित्रपट पाहिला. खूपच अप्रतिम आहे. चित्रपटाचं लेखन, निर्मिती, अभिनय सर्वच उत्तम झालंय. या चित्रपटासाठी सूर्या शिवकुमारसह टीमचं विशेष आभार.' असं त्यांनी म्हंटलंय. आमदार सौम्या यांनी देखील जय भीम चित्रपटाचं एक पोस्टर शेअर करत चित्रपट पाहण्याचं आवाहन केलंय. ही कलाकृती अप्रतिम असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

Jai Bhim Film
'शाब्बास शेरा' म्हणत क्रांतीने केलं समीर वानखेडेंचं कौतुक

राजदचे आमदार प्रल्हाद यादव यांनीही जय भीम चित्रपटावर ट्वीट करत म्हटलंय, जय भीम चित्रपटानं आयएमडीबी यादीत भारतीय चित्रपटांमध्ये सर्वात्कृष्ट मानांकन मिळवलं. हा चित्रपट १९९३ मधील कुडलोर घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर ९.८ रेटिंग मिळालंय. चित्रपट निर्मात्या टीमचं अभिनंदन. जय भीम हा उत्कृष्ट चित्रपट आहे, असंही त्यांनी म्हंटलंय.

'मी आत्ताच जय भीम चित्रपट पाहिला. सूर्या शिवकुमार सर यांच्या बद्दलचा आदर खूपच वाढलाय. याशिवाय, सेनगानी आणि राजाकन्नू या पात्रांची भूमिका निभावणाऱ्या अभिनेत्यांचं विशेष कौतुक. कारण, त्यांनी अप्रतिम अशी भूमिका वटवलीय, असं ट्विट कर अभिनेता नानीनं संपूर्ण टीमचं कौतुक केलंय. अभिनेता सूर्यानं देखील ट्विटरवर चाहत्यांचे आभार मानले आहेत आणि असंच आमच्यावर प्रेम राहू दे असं त्यानं म्हंटलंय.

Jai Bhim Film
अखेर केएल राहुलने अथियाच्या प्रेमाची दिली जाहीर कबुली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.