सेलिब्रेटी बाप्पा! गर्दी टाळूनच यंदा गणेशोत्सवाचा आनंद साजरा करू या - श्रेया बुगडे

सेलिब्रेटी बाप्पा! गर्दी टाळूनच यंदा गणेशोत्सवाचा आनंद साजरा करू या - श्रेया बुगडे

Published on


अभिनेत्री श्रेया बुगडेच्या घरी यंदाही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होणार आहे, मात्र कोरोना संकटामुळे गर्दी टाळण्यालाच तिचे प्राधान्य असणार आहे... 

आधी आमचा गणेशोत्सव पुण्याला माझ्या सासरी साजरा व्हायचा, पण गेली दोन वर्षे तो आमच्या घरी इथे मुंबईत असतो. माझे आणि बाप्पाचे एक वेगळे नाते आहे. दोन वर्षे आम्ही दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा केला. तेव्हा असे व्हायचे की तयारीला जास्त दिवस आणि लगेच दुसऱ्या दिवशी विसर्जन. दोन दिवसांत आमच्याकडे भरपूर मित्रमंडळी आणि नातेवाईक दर्शनाला येऊन जायचे. साहजिकच बाप्पाची सेवा करायलाही फार वेळ मिळायचा नाही. त्यामुळे गेल्या वर्षापासून आम्ही पाच दिवसांचा गणेशोत्सव सुरू केला. यंदाही आमचा उत्सव पाच दिवसांचा असेल. मात्र, सुरक्षित अंतराच्या नियमामुळे कोणालाही आमंत्रण देणार नाही. अगदीच घरातले नातेवाईक असू. 

मी कधीही ठरवून बुक करायला जात नाही. मला असे वाटते, की मूर्तीच आपल्याला सांगते की मला तुमच्या घरी यायचे आहे. जी मूर्ती मनाला भावेल ती आम्ही आणतो. आमची मूर्ती दरवर्षी शाडू मातीचीच असते. आमची मूर्ती नेहमी उंचीने थोडी जास्त असते. परंतु, यंदा सरकारी नियमांनुसारच लहान मूर्ती आणणार आहोत. विसर्जनही आम्ही घरच्या घरी एक पिंप सजवून त्यात करणार आहोत. आमचा कायमच नैसर्गिक आरास करण्याकडे भर असतो. कधीच आम्ही मुद्दाम मखर वगैरे आणत नाही. मला वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची फार आवड आहे. फुले पाहून प्रसन्न वाटते. एक वेगळाच सकारात्मक विचार मिळतो. त्यामुळे आम्ही बाप्पाची आरास फुलांचीच करतो. त्याने पर्यावरणाचीही हानी होत नाही. 

परिस्थिती पूर्वपदावर येईलच 
सरकारने यंदा गणेशोत्सवासाठी आखून दिलेल्या नियमांचे स्वागतच आहे. कारण, बाप्पाप्रमाणेच आपले आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. नियमांचे बंधन असले तरी गणेशोत्सवाचा आनंद आहेच. गणपती बाप्पा लवकरच परिस्थिती पूर्वपदावर आणेल, असा विश्‍वास आहे. 
------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.