Mohammad Siraj Asia Cup 2023: काल सर्वत्र चर्चा होती ती आशिया कप 2023 ची फायनलची. हा सामना अवघ्या 21.3 षटकात संपुष्टात आला. श्रीलंकेला अवघ्या 50 धावात भारताने पुन्हा तंबूत पाठवले.
पाच वर्षांनंतर भारताने पुन्हा एकदा आशिया कपचे विजेतेपद पटकावले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने फायनलमध्ये श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला आणि आठव्यांदा ही स्पर्धा जिंकली.
आशिया कप फायनलमध्ये मोहम्मद सिराजने आपल्या गोलंदाजीने सर्वांना त्याचं चाहते बनवले. या सामन्यात मोहम्मद सिराजने श्रीलंकेचे 6 विकेट घेतले.
या विजयानंतर सर्वत्र जल्लोष करण्यात आला. अनेक सेलिब्रिटींनी देखील टीम इंडियाचे अभिनंदन केले आणि मोहम्मद सिराजचं तोंड भरुन कौतुकही केलं. तर दाक्षिणात्य दिग्दर्शक एसएस राजामौली तसंच महेश बाबू आणि विकी कौशल आणि अनुष्का शर्मा यांच्यासह अनेक स्टार्सनी देखील पोस्ट शेयर करत टीमचे अभिनंदन केले.
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरनेही सिराजच्या या कामगिरीवर प्रतिक्रिया दिली. तिने इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करत सिराजला एक प्रश्न विचारला आहे.
वीकेंडला आयोजित करण्यात आलेल्या या सामन्याची उत्सूकता सर्वांनाच होती. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होईल अशी आशा असतांना भारताच्या दमदार खेळीने हा सामना अवघ्या 2 तासात संपवला.
त्यावर श्रद्धा कपूरने इन्स्टाग्रामवर कारमधील साध्या पांढऱ्या ड्रेसमध्ये स्वतःचा फोटो शेअर करत श्रद्धाने मोहम्मद सिराजला विचारले की, "आता सिराजला विचारा की या रिकाम्या वेळेचे काय करायचे..."
एसएस राजामौली यांनी लिहिले की, 'सिराज मियाँ, आमचा टोलीचौकीचा मुलगा आशिया कप फायनलमध्ये 6 विकेट घेत चमकला आणि त्याचं हृदय खुप मोठे आहे, तो आपल्या गोलंदाजीने चौकार रोखण्यासाठी लाँग-ऑनवर धावतो.'
महेश बाबूने देखील टिम इंडियाचा फोटो शेयर करत कौतूक केले. तर अनुष्का शर्माने सिराजचं कौतुक केले आहे. 'क्या बात है मिया मॅजिक'. तर अजय देवगणने ट्विट करून अभिनंदन केले आहे. यात अजय म्हणतो की, "क्या बॉलिंग किये हो सिराज..टिम इंडियाची जादू अन् विजय आता आम्ही विश्वचषकासाठी तयार आहोत". तर विकी कौशलनेही पोस्ट शेयर केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.