क्रिकेटरची बायको शोभतेस,त्या भूमिकेत नाही;नेटिझन्सच्या रडारवर अनुष्का

'चकदा एक्सप्रेस' या बायोपीक मध्ये साकारणार झुलन गोस्वामींची व्यक्तिरेखा
Jhulan Goswami,Anushka Sharma
Jhulan Goswami,Anushka SharmaGoogle
Updated on

आतापर्यंत आपण म्हणत होतो की विराट कोहलीसोबत लग्न झाल्यानंतर अनुष्कानं कुटुंबात रमणं पसंद केलं म्हणून सिनेमात काम कमी केलं. आई होण्याचा निर्णय हे ही कारण असू शकतं त्यामागे. त्यानंतर मग विराटला सपोर्ट म्हणून त्याच्यासोबत क्रिकेट दौ-यावर तिचं सतत जाणं हे पाहूनही वाटायचं टोटल हाऊस वाईफ झाली. पण जसा आज तिच्या 'चकदा एक्सप्रेस' या आगामी सिनेमाचा टीजर रीलीज झाला तसे वरील सगळ्या विचारांवर एकदम पडदा पडला. आता कळतंय की क्रिकेट दौ-यावर जाण्यामागचं नेमकं कारण होतं की अनुष्का मॅडमना क्रिकेटरचं लाईफ,क्रिकेट खेळतानाचा माहौल,फॅन्स,मैदानावरचं क्रिकेटरचं वागणं हे अगदी जवळून अनुभवायचं होतं म्हणून ही सगळी धडपड चालू होती. असो अभ्यास का जे काही म्हणतात तो उत्तम केला अनुष्काने. घरात शिक्षक असतानाही बाहेर जाऊन ज्ञान घेतल्यावर आपण अधिक उत्तम तयार होतो यावर तिचा विश्वास असेल बहुधा. आणि खरं आहे की ते. तर असो आपण मुळ मुद्दयावर येऊया.

Jhulan Goswami,Anushka Sharma
कतरिना सलमानच्या प्रेमात असल्याचा आमिरनं घेतला होता फायदा...

तब्बल तीन वर्षानंतर अनुष्का शर्मा 'चकदा एक्सप्रेस' या सिनेमातून आपल्याला दिसणार आहे. हा सिनेमा एक बायोपीक आहे. भारतीय महिला संघाच्या माजी कॅप्टन झुलन गोस्वामी यांच्यावर आधारित हा सिनेमा आहे. अर्थात हे तर यावरनं नक्कीच कळतंय की सिनेमा पूर्णपणे महिला क्रिकेट विश्वाला समर्पित केलेला असणार. 'चकदा एक्सप्रेस' चं दिग्दर्शन प्रोसित रॉय यांनी केलं आहे. कर्णेश शर्मा यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून याची कथा अभिषेक बॅनर्जी यांनी लिहिली आहे. अनुष्काने यापूर्वी प्रोसित रॉय यांच्यासोबत 'परी' चित्रपटात काम केलं आहे. सिनेमाचा टीझर अनुष्कानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. ज्या टीझरमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया मधील महिला क्रिकेटचा सामना रंगलेला दिसतोय. ज्यात भारतीय महिला क्रिकेटर स्वतः आपल्या जर्सीवर नावाचा कागद चिकटवतात. आणि त्यावर अनुष्कानं मारलेला डायलॉगही लगोलग वायरल झालाय. ती म्हणतेय,''जब जर्सी खुद के नाम का नहीं तो फॅन किस नाम को फॉलो करेगा'' झुलन गोस्वामी या बंगाली असल्यानं अर्थातच अनुष्काच्या भाषेचा लहजाही तसाच ऐकायला मिळतोय.

पण हा टीझर रीलीज झाल्यावर मात्र नेटिझन्सच्या यावर अनुष्काला घेऊन खूप नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. कुणी म्हणतंय,'दुसरी बंगाली लूक असणारी अभिनेत्री झुलन गोस्वामींच्या व्यक्तीरेखेसाठी सापडली नाही का?'. कुणी म्हणतंय,'अनुष्का शोभत नाही'. कुणी म्हणतंय,'तिच्या तोंडी बंगाली भाषा शोभत नाही,तिला नीट बोलता आलेली नाही ती भाषा'. कुणी म्हणतंय,'विराटची बायको असल्याचा झाला फायदा'....अशा ना-ना नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. पण काय आहे ना खरंतर अनुष्का एक उत्तम अभिनेत्री आहे हे तिनं सिद्ध केलंय. त्यामुळे 'नेटफ्लिक्स' वर संपूर्ण सिनेमा पाहून प्रतिक्रिया दिल्या तर बरे होईल. कारण केवळ एका टीझरवरून संपूर्ण सिनेमाचं किंवा अनुष्काच्या भूमिकेचं मूल्यमापन करणं चुकीचं आहे. तेव्हा सिनेमा पाहिल्यावरच ठरवू नेमकं महिला क्रिकेट विश्व आणि झुलन गोस्वामी यांच्या व्यक्तिरेखेला योग्य न्याय दिलाय का 'चकदा एक्सप्रेस'च्या टीमनं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()