Chandrababu Naidu Arrest Actor Pawan Kalyan Video Viral : आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. या धक्कादायक बातमीचे आंध्रप्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर पडसाद उमटल्याचे दिसून आले आहे. यात साऊथच्या एका प्रसिद्ध अभिनेत्यानं जे काही केलं आहे त्याची चर्चा सुरु झाली आहे.
साऊथमध्ये अभिनेता पवन कल्याण याचे नाव मोठे आहे. त्याचे स्टारडम मोठे आहे. त्याच्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसादही लक्षणीय असल्याचे दिसून आले आहे. अशातच पवनला जेव्हा चंद्राबाबूंना अटक करण्यात आली असे कळली तेव्हा त्यानं जे काही केलं त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पवनची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
Also Read - हॅप्पी हार्मोन...
चंद्राबाबू यांना अटक झाल्याच्या निषेधार्ध पवन कल्याणनं रस्त्यावर झोपून त्या गोष्टीचा निषेध केला आहे. तो व्हिडिओ आता तुफान लोकप्रिय झाला आहे. त्यावरुन पवनला नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंट्सही भन्नाट आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन कल्याणला आंध्रप्रदेशमध्ये जायचे होते. आणि त्याला पोलिसांनी परवानगी नाकारली. तेव्हा त्यानं पोलिसांच्या आठमुठेपणाला विरोध म्हणून चक्क रस्त्यावर झोपून आपला राग व्यक्त केला आहे.
विजयवाडाकडे निघालेल्या पवनच्या वाहनांचा ताफा रोखण्यात आला होता. त्यानंतर त्याठिकाणी पोलिसांनी त्याला आंध्रप्रदेशमध्ये जाण्यापासून रोखले. पोलिसांनी पवनचा दोनदा मार्ग रोखल्याचे सांगण्यात येत आहे. असं म्हटलं जातं आहे की, तो आंध्रप्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या भेटीला निघाला होता. हे सगळं आता सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याची चर्चा होत आहे.
पवन हा एक प्रसिद्ध अभिनेता असून तो आता राजकारणात देखील सक्रिय झाला आहे. तो जन सेनेचा नेता आहे. त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्याच्या नावाचा करिष्मा काही वेगळाच असल्याचे सांगण्यात येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.