Marathi Entertainment: मराठी साहित्य विश्वातील प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' या कादंबरीवर आधारित 'चंद्रमुखी' या चित्रपटाचा टिझर काही (Marathi Movies) महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर झळकला. खरंतर घोषणेपासूनच हा चित्रपट अनेकांसाठी चर्चेचा विषय होता आणि टिझरनंतर या चर्चांना अधिकच उधाण आले. त्यात टिझरमध्ये कोणत्याच कलाकाराचा चेहरा समोर न (Marathi actor) आल्याने ही उत्सुकता अधिकच वाढली. टिझरमध्ये पिळदार शरीरयष्टी असणारा पाठमोरा 'तो' ध्येयधुरंदर राजकारणी दिसत आहे. हा चेहरा कोण असेल याविषयी अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. अखेर या प्रश्नाला पूर्णविराम देत ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर आली आहे. महाराष्ट्रातील एक असा नेता जो समाजाच्या हितासाठी, प्रत्येकाला मदत करण्यासाठी तत्पर असणारा, महाराष्ट्राची लोककला जपणारा, त्यांचे हक्क मिळवून देणारा आणि आपल्या ध्येयपूर्तीसाठी धडपडणारा 'दौलत देशमाने' आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे.
अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन्स प्रस्तुत, फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, लाइटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले असून पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. तर या चित्रपटाला अजय -अतुल यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे. आदिनाथ कोठारे भूमिकेबद्दल म्हणतो, ''निर्मिती, दिग्दर्शन, बॉलिवूड चित्रपट केल्यानंतर आता बऱ्याच काळाने आपल्या भाषेत अभिनय करत आहे आणि त्यातही इतकी दमदार भूमिका साकारण्याची संधी मिळतेय, त्यामुळे यापेक्षा वेगळा आनंद कोणता असूच शकत नाही. भूमिकेबद्दल सांगायचे तर यापूर्वीही मी राजकारण्याची भूमिका साकारली आहे. मात्र ही भूमिका खूप वेगळी आहे. एक असा राजकारणी ज्याची आयुष्यात काही ध्येय आहेत. तो समाजकल्याणासाठी, हक्कांसाठी लढत, धडपडत आहे. त्याच्या या धडपडीला यश मिळेल का, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. प्रसाद ओक यांच्यासोबत काम करण्याचा एक वेगळाच अनुभव आहे.
व्यक्तिरेखेबद्दलची प्रतिमा त्यांच्या डोक्यात निश्चित असल्याने समोरच्याकडून अपेक्षित आणि उत्तम अभिनय ते करून घेतात. माझ्या ह्या भूमिकेसाठी मी घेतलेल्या मेहनतीविषयी सांगायचे तर, प्रत्येक कलाकाराला कोणतीही भूमिका साकारताना त्या व्यक्तिरेखेशी समरस होण्यासाठी मेहनत ही घ्यावीच लागते. त्या व्यक्तिरेखेचा अभ्यास करावाच लागतो. तसाच ह्या व्यक्तिरेखेच्या देहबोलीचा, वागण्यातील करारीपणाचा अभ्यास मी नक्कीच केला.'' तर दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणतात, ''यापूर्वी मी आदिनाथचे काम पाहिले आहे. त्यामुळे दौलतच्या व्यक्तिरेखेत तो चपखल बसला. त्याने त्याच्या भूमिकेला शंभर टक्के न्याय दिला आहे. टिझरमध्येच आपल्याला दौलतच्या व्यक्तिरेखेचा अंदाज आला आहे. त्यामुळे पडद्यावर दौलत काय करणार आहे, हे प्रेक्षकांना कळेलच. आता 'चंद्रमुखी' समोर यायची आहे. तीही लवकरच आपल्या भेटीला येईल.''
प्लॅनेट मराठी’चे संस्थापक, प्रमुख अक्षय बर्दापूरकर 'चंद्रमुखी'विषयी म्हणतात, ''आतापर्यंत 'प्लॅनेट मराठी'ला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. म्हणूनच त्यांच्यासाठी आम्ही 'चंद्रमुखी'सारखा भव्य चित्रपट घेऊन येत आहोत. इतर कोणत्याही माध्यमावर हा चित्रपट प्रदर्शित न करता केवळ चित्रपटगृहातच या चित्रपटाची भव्यता प्रेक्षकांनी अनुभवावी, असा आमचा अट्टाहास असल्याने आम्ही इतका काळ प्रतीक्षा केली. पन्नास टक्के आसन क्षमता असतानाही हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे टाळले. आता शंभर टक्के आसन क्षमता असल्याने प्रदर्शनाची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे लवकरच ‘चंद्रमुखी’ आपल्या भेटीला येणार आहे. यात प्रेक्षकांना राजकारण आणि त्याभोवती फिरणारी प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथाही एकदम दमदार आहे. आम्हाला आनंद आहे की, असे चित्रपट आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत.''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.