Marathi Movie - मराठी मनोरंजन विश्वामध्ये सध्या प्रसाद ओक दिग्दर्शित (Prasad Oak) चंद्रमुखी चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. मुळात ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी कादंबरीवर आधारित हा चित्रपट (Chandramukhi Movie) असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये एका बड्या राजकीय नेत्याचे चंद्रमुखी नावाच्या कलावंतीणीवर प्रेम होते. त्यांचे प्रेम, कौटूंबिक संघर्ष, राजकीय क्षेत्रामध्ये त्याचे उमटलेले पडसाद हे सारं त्या चित्रपटामध्ये (Marathi Actress) दाखवण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र कादंबरीतील व्यक्तिरेखा आणि प्रसंग हे वास्तविक असल्याचे राज्याच्या राजकीय वर्तुळात नेहमीच बोलले जाते. सध्या चंद्रमुखी चित्रपटावरुन त्या प्रेमकथेच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळताना दिसतो आहे.
प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी चित्रपटाचा ट्रेलर (Chandramukhi Trailer) काल व्हायरल झाला. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. येत्या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे, समीर चौगुले यांच्या भूमिका आहेत. श्रेया घोषालच्या आवाजातील आणि अजय अतुलच्या संगीतानं सजलेली लावणी जेव्हा व्हायरल झाली तेव्हा प्रेक्षकांना चंद्रमुखीची ओढ लागली होती. गेल्या काही दिवसांपासून चंद्रमुखीची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातील चंद्रा आणि दौलतराव यांची कथा प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर घडलेली कथा असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. राज्याच्या राजकारणातील बऱ्याचशा गोष्टींविषयी माहिती असणाऱ्यांना चंद्रमुखी हे काय प्रकरण आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही.
असं म्हटलं जातं ज्यावेळी त्या बड्या नेत्याचं नाव जेव्हा लावणी कलावंतीणीशी जोडलं गेलं तेव्हा अनेकांना धक्का बसला होता. त्यावेळी त्या प्रकरणाची मोठ्या प्रमाणावर चर्चा होती. त्यात अडकलेल्या त्या राजकीय नेत्यांने मग शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यांनी त्या नेत्यासाठी तातडीनं एका बैठकीचे आयोजन केले होते. त्यात ठाकरे यांनी आपल्या भाषणातून जाहीरपणे त्या नेत्याच्या लवस्टोरीविषयी भाष्य केले होते. त्या नेत्याकडे पाहत बाळासाहेब म्हणाले होते, जब प्यार किया तो डरना क्या....चंद्रमुखीच्या निमित्तानं पुन्हा त्या नेत्याच्या लवस्टोरीला उधाण आले आहे. चंद्रमुखी या चित्रपटातील संवादलेखन मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.