Adipurush: आदिपुरुष चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 'छपरी' हा शब्द का होतोय सोशल मिडियावर ट्रेंड?

Adipurush Memes
Adipurush MemesEsakal
Updated on

आदिपुरुष हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासूनच चर्चेत होता. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर काल म्हणजे 16 जून रोजी प्रदर्शित झाला. खुप मोठ्या अपेक्षेने प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी गेले होते.

मात्र हा चित्रपट पाहिल्यानंतर पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा अपेक्षा भंग झाला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटानं चांगली कमाई केली असली तरी सोशल मिडियावर बॉयकॉट आदिपुरुष आणि छपरी आदिपुरुष असे अनेक हॅशटॅग ट्रेंड करत आहेत.

आता छपरी हा शब्द इतका व्हायरल झाला की नेटकरी या शब्दचा अर्थ शोधत आहे. तुम्ही अनेकदा लोकांच्या तोंडून हा शब्द ऐकला असेल की काय छपरीसारखे कपडे घातले आहेत किंवा ती व्यक्ती छपरी आहे.

हा एक प्रकारचा अपशब्द आहे. सोशल मीडियावर विचित्र व्हिडिओ बनवणाऱ्या काही लोकांसाठी देखील हा शब्द बऱ्याचदा कमेंटमध्ये वापरला जातो.

Adipurush Memes
Adipurush Reactions Video: आदिपुरुषला भंगार म्हटलं अन् प्रभासच्या चाहत्यांनी थिएटर बाहेरच हाणलं! व्हिडिओ व्हायरल

त्याच झालं असं की शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या 'आदिपुरुष' चित्रपटाबाबत हा शब्द सोशल मीडियावर खूप ट्रेंड झाला.

छपरी हा शब्द का व्हायरल होत आहे आणि त्याचा आदिपुरुषाशी काय संबंध असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच तर छपरी या शब्दाचा अर्थ काय हे जाणून घेवुया.

Adipurush Memes
Adipurush: हे तर रामायणाचे विडंबन, आदिपुरुष विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल

छपरी हा शब्द जर तुम्ही Google वर शोधला तर Google तुम्हाला Urban Dictionary मधील पानावर उघडत. त्यात छापरी म्हणजे "एक बेजबाबदार व्यक्ती. असा उल्लेख आहे.

असा व्यक्ती ज्याला असे वाटते की ट्रेंडी हेअरकट आणि कपडे त्याला खास आणि आकर्षक बनवतात आणि समाजात कोणतेही काम न करता सोशल मीडियावर आपला वेळ वाया घालवतात. "

Reddit नुसार या शब्दामागे काही इतिहासही असू शकतो असं सांगण्यात आलं येत. आपल्यापैकी बरेचजण संभाषणात याचा वापर करतात मात्र हा एक जातिवादी अपशब्द असू शकते असं देखील बोलल जाते. त्याचबरोबर छपरी व्यतिरिक्त निब्बा-निब्बी असे अनेक शब्दही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

Adipurush Memes
Adipurush Box Office Collection: सडकून टीका.. तरीही दणकून कमाई! आकडा पाहून डोळे फिरतील..

हे सर्व शब्द सोशल मिडियावर आदिपुरुष या चित्रपटासाठी वापरण्यात येत आहे. कारण या चित्रपटात भगवान श्री रामाचा आणि संपुर्ण रामायणाचाच अपमान करण्यात आल्याचा आरोप प्रेक्षक करत आहे.

600 कोटींचा इतका तगड्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेला 'आदिपुरुष' हा मल्टीस्टारर चित्रपट शुक्रवारी जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा पहिला दिवस आणि पहिला शो संपल्यानंतर या चित्रपटावर सडकून टिका करणही सुरु झालं.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट टेण्ड करु लागला. रावणाच्या लुक, त्याची भाषा, चित्रपटातील कलाकारांची वेषभूषा आणि व्हीएफएक्सची खुप खिल्ली उडवण्यात आली आणि अनेक मीम्स मिडियावर शेयरही करण्यात आले. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी याला 'छपरी' म्हटले आहे.

Adipurush Memes
Adipurush: मुद्दामच तसं लिहिलं.. हनुमानाच्या वादग्रस्त डायलॉगवर लेखकाची सारवासारव..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.