चेहरे'चा ट्रेलर पाहण्यापूर्वीच बिग बींची 'वॉर्निंग'...

लॉकडाऊननंतर lockdown मोठ्या प्रमाणात बॉलीवूडमधून bollywood चित्रपट प्रदर्शित व्हायला लागले आहेत.
चेहरे'चा ट्रेलर पाहण्यापूर्वीच बिग बींची 'वॉर्निंग'...
Updated on

मुंबई - लॉकडाऊननंतर lockdown मोठ्या प्रमाणात बॉलीवूडमधून bollywood चित्रपट प्रदर्शित व्हायला लागले आहेत. कोरोनाच्या काळात मनोरंजन क्षेत्राबाबत अनेकजण चिंता व्यक्त केली जात होती. कित्येक चित्रपटांची निर्मिती आणि त्यांचे प्रदर्शन थांबवण्यात आले होते. त्यात मोठमोठ्या सेलिब्रेटींचेही चित्रपट होते. आता थिटएर सुरु होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मोठ्या संख्येनं चित्रपट प्रदर्शित होण्यास सुरुवात झाली आहे. बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा बेल बॉटम bell bottom हा लॉकडाऊनंतर थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट असणार आहे. दुसरीकडे महानायक अमिताभ amitabh bachchan यांचा चेहरे नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चेहरेचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मात्र त्या ट्रेलरपूर्वी बिग बी यांनी एक वैधानिक चेतावनी दिली आहे. त्यामुळे तो ट्रेलर चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर चेहऱ्याच्या ट्रेलरला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अमिताभ यांच्याबरोबर इमरान हाश्मी हा देखील यात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तो पहिल्यांदाच अमिताभ यांच्याबरोबर दिसणार आहे. त्यानं यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, हे माझ्यासाठी एका स्वप्नासारखं असणार आहे. येत्या 27 ऑगस्टला चेहरे थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्याचे दिग्दर्शन रुमी जाफरीनं केलं आहे.

चेहरे या चित्रपटाचे निर्माते आनंद पंडित आहेत. चित्रपटामध्ये रिया चक्रवर्तीचाही समावेश आहे. तिच्या फोटोंवरुनही हा चित्रपट चर्चेत आला होता. अमिताभ यांनी चेहरेच्या नव्या ट्रेलरसोबत एक चेतावनी दिली आहे. त्यात ते म्हणतात, तुम्ही जर कोणता अपराध केला असेल तर तुम्ही सांभाळून राहण्याची गरज आहे. कारण हा खेळ तुमच्यासोबत देखील खेळला जाऊ शकतो. त्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, सावधान आपल्याला चेतावनी देण्यात आली आहे. कारण तुमच्यावरही एक वेगळा आरोप होऊ शकतो.

चेहरे'चा ट्रेलर पाहण्यापूर्वीच बिग बींची 'वॉर्निंग'...
Video: बादशाहचं सहदेव दिर्दोसोबत 'बचपन का प्यार'

या चित्रपटामध्ये क्रिस्टल डिसुजा, अन्नु कपूर, रघुबीर यादव, सिद्धांत कपूर, धृतिमान चक्रवर्ती हे दिसणार आहेत. वास्तविक चेहरे हा 9 एप्रिलाच प्रदर्शित होणार होता. मात्र त्याची तारिख पुढे ढकलण्यात आली. काही करुन आपल्याला थिएटरमध्ये हा सिनेमा प्रदर्शित करायचा होता असे निर्मात्यांनी सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.