Chennai Floods Affect: सध्या तामिळनाडूमध्ये मिचॉन्ग चक्रीवादळामुळे हाहाकार होत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने हे वादळ आणखी तीव्र झाले आहे.
या चक्रीवादळामुळे तामिळनाडूमधील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
या चक्रीवादळाचा जास्त फटका चेन्नईला बसला आहे. तेथील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. पाण्यामुळे अनेक लोकांची घरे पाण्याखाली गेली आहे त्यामुळे परिस्थिती खुपच बिकट झाल्याचे दिसत आहे.
अशातच एक मोठी बातमी समोर येतेय ती म्हणजे, चेन्नईच्या चक्रीवादळामुळे सुपरस्टार रजनीकांत यांच्या घरातही पाणी घुसले आहे.
चेन्नईच्यामधील पोस गार्डन परिसरात असलेल्या रजनीकांत यांच्या घरालाही पूराचा फटका बसला आहे. सध्या रजनीकांत यांच्या घराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिचॉन्ग चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे चेन्नईच्या पॉश एरिया पोस गार्डनचे अनेक रस्ते पाण्यात बुडाले आहे. सर्वत्र पाणी झाले आहे. त्यापासून सुपरस्टार रजनीकांत यांचे घरही वाचू शकलेले नाही. व्हिडिओमध्ये दिसत आहे.
ज्यावेळी घरात पाणी शिरले त्यावेळी रजनीकांत घरी नव्हते. सध्या त्यांचे कुटुंबही दुसरीकडे स्थलांतरित झाले आहे.
रजनीकांत यांच्या घरात पाणी शिरल्याचा व्हिडिओ एका चाहत्याने शूट करुन सोशल मिडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर थलायवा सुद्धा या पूरस्थितीत अडकल्याचे चाहते म्हणत आहेत.
काही दिवसांपुर्वी चेन्नईच्या पूरजन्य परिस्थितीत प्रसिद्ध अभिनेता आमिर खान सुद्धा अडकलाय. त्याची मदत विष्णु विशाल या साऊथ अभिनेत्याने केली होती.
यापुर्वी विशालने देखील चेन्नईमधील भयानक चक्रीवादळ मिचौंगचे फोटो X वर शेअर केले होते. यावेळी विशालने लिहिले, "माझ्या घरात पाणी शिरत आहे आणि करपक्कममध्ये पाण्याची पातळी वाईटरित्या वाढत आहे.
मी मदतीसाठी कॉल केला आहे. वीज नाही, वायफाय नाही, फोनला नेटवर्क नाही. फक्त टेरेसवर एका विशिष्ट ठिकाणी मला थोडंसं नेटवर्क मिळेल, अशी आशा. मोबाईलला नेटवर्क आलं तर येथील लोकांना काहीतरी मदत मिळेल. मला चेन्नईतील लोकांसाठी वाईट वाटते. #staystrong.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.