Chiranjeevi Cancer Update: चिरंजीवीला झालाय कॅन्सर? अखेर अभिनेत्याने संतप्त प्रतिक्रिया देऊन मौन सोडलं

चिरंजीवीला कॅन्सर झाल्याच्या बातमीने त्यांचे चाहतेही काळ्जीत पडले होते. आता चिरंजीवीने हेल्थ अपडेट दिले आहे.
chiranjeevi cancer health update actor break silence about his health
chiranjeevi cancer health update actor break silence about his healthSAKAL
Updated on

Chiranjeevi Cancer Update News: सुपरस्टार चिरंजीवी यांच्याविषयी यांच्याविषयी एक धक्कादायक बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली आहे. ती म्हणजे सुपरस्टार चिरंजीवी यांना कँसर झालाय.

अभिनेता राम चरणचे वडील आणि साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांनी अभिनेत्याला कॅन्सर झाल्याचे निदान झाल्याच्या बातमीची सध्या सगळीकडे चर्चा आहे. पण आता या सर्व बातम्यांवर चिरंजीवी यांनी मौन सोडलंय.

(chiranjeevi cancer health update actor break silence about his health )

chiranjeevi cancer health update actor break silence about his health
Ruturaj Gaikwad Wedding: सायली संजीवने दिल्या ऋतुराजला लग्नाच्या शुभेच्छा.. मोजक्या शब्दात विषय संपवला

चिरंजीवीने कॅन्सर झाल्याच्या बातम्यांचं खंडन केलं नाही तर अशा बातम्या पसरवल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे.

चिरंजीवी यांनी सांगितले की, त्यांना कर्करोग नसलेले पॉलीप्स आढळले होते, जे काढून टाकण्यात आले आहेत. चिरंजीवीला कॅन्सर झाल्याच्या बातमीने त्यांचे चाहतेही काळ्जीत पडले होते. आता चिरंजीवीने हेल्थ अपडेट दिले आहे.

chiranjeevi cancer health update actor break silence about his health
Nitin Gopi Death: ३९ व्या वर्षी लोकप्रिय अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, कलाकारांना धक्का

काही दिवसांपूर्वी चिरंजीवींनी एका कॅन्सर सेंटरचे उद्घाटन केले होते. चिरंजीवी जे काही बोलले त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला.

चिरंजीवी आता कॅन्सरमधून बरा झाल्याचा दावा अहवालात सुरू झाला आहे. जेव्हा चिरंजीवीने स्वतःला कॅन्सर झाल्याची आणि त्यातून बरे झाल्याची बातमी वाचली तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले.

चिरंजीवीची संतप्त प्रतिक्रीया

चिरंजीवीने आता ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे की, मला कॅन्सर झाला नाही आणि कॅन्सरची कोणतीही लक्षणं नाही.

चिरंजीवीने लिहिले की, 'काही वेळापूर्वी एका कॅन्सर सेंटरचे उद्घाटन करताना मी कॅन्सरबद्दल जनजागृती करण्याची गरज बोलली होती. मी तुम्हाला सांगितले की जर तुम्ही नियमित वैद्यकीय चाचण्या घेतल्या तर तुम्ही कर्करोग टाळू शकता.

मी सावध होतो आणि कोलन स्कोप टेस्ट करून घेतली. जेव्हा टेस्ट केली तेव्हा कर्करोग नसलेले (कर्करोग नसलेले) पॉलीप्स आढळले.

मी असं म्हणालो होतो की जर माझी चाचणी झाली नाही तर त्याचे कॅन्सरमध्ये रुपांतर झाले असते. म्हणूनच प्रत्येकाने सावध राहून चाचणी करून घेतली पाहिजे. मी इतकंच म्हणालो.

chiranjeevi cancer health update actor break silence about his health
Jui Gadkari सायलीची पहिली वटपौर्णिमा, पिवळ्या साडीत सजली

चिरंजीवीचं आवाहन


चिरंजीवीने पुढे लिहिले की, 'पण काही माध्यम संस्थांनी माझं बोलणं नीट समजून घेतले नाही आणि 'मला कॅन्सर झाला' आणि 'उपचारांमुळे मी वाचलो' असे लेख लिहिले.

त्यामुळे विनाकारण गोंधळ निर्माण झाला आहे. अनेक चाहते माझ्या प्रकृतीबाबत सदिच्छा देत आहेत. हे स्पष्टीकरण त्या सर्वांसाठी आहे.

पत्रकारांनी अशा खोट्या बातम्या देऊ नयेत असे आवाहन मी करतो. विषय समजून घेतल्याशिवाय मूर्खपणाचे लिहू नका. यामुळे अनेक लोक घाबरले आणि दुखावले गेले." अशी पोस्ट चिरंजीवीने केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.