Chiranjeevi South Megastar Padma Vibhushan Fans paid tribute: साऊथचे मेगास्टार चिरंजीवी यांना नुकताच मानाचा पद्मविभुषण पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराची घोषणा होताच चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून चिरंजीवी यांचे नाव घेतले जाते.
चिरंजीवी यांना सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असा पद्मविभुषण जाहीर झाल्यानंतर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारे चिरंजीवी यांच्या अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. त्यानंतर एका चाहत्यानं त्यांचा फोटो हा टाईम्स स्क्वेअरवर झळकवल्याचे दिसून आले आहे.तो फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
चिरंजीवी यांचा तो फोटो न्युयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकवल्यानंतर चाहत्यांनी चिरंजीवी यांच्यावर वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. २५ जानेवारी रोजी देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आले. यात पद्मश्री, पद्मभुषण आणि पद्मविभुषण या पुरस्कारांचा समावेश होता. याशिवाय अभिनेत्री वैजयंती माला यांना देखील पद्मविभुषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायिका उषा उत्थुप, अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांमा पद्मभुषण पुरस्कार जाहीर झाला आहे. या सगळ्यात चर्चा होत आहे ती चिरंजीवी यांच्या कुंदावरपू श्रीनिवास नायडू नावाच्या चाहत्याची. त्यानं टाईम्स स्क्वेअरवर चिरंजीवी यांना पेड ट्रीब्युट दिल्याचे दिसून आले आहे. चिरंजीवी यांचा तो व्हिडिओ आता सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो आहे.
प्रसिद्ध अभिनेता ज्युनिअर एनटीआर, मामुट्टी, महेश बाबू आणि इतर अनेक सेलिब्रेटींनी चिरंजीवी यांचे अभिनंदन करत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केल्याचे दिसून आले आहे. चिरंजीवी यांच्या त्या चाहत्यानं आपल्या आवडत्या अभिनेत्यासाठी खास पोस्ट देखील शेयर केली आहे त्यात तो म्हणतो, खूप खूप अभिनंदन,मेगास्टार चिरंजीवी यांना भारताचा मानाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे कौतुक आणि अभिनंदन.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.