Chris Peluso: 'ममा मिया' फेम अभिनेता ख्रिस पेलूसोचे निधन, अवघ्या ४० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

द युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनमधून त्यानं त्याचे शिक्षण पूर्ण केले होते. युनिव्हर्सिटीनं त्याच्या निधनानंतर इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेयर केली आहे.
Chris Peluso death wicked and mamma mia actor
Chris Peluso death wicked and mamma mia actoresakal
Updated on

Chris Peluso death wicked and mamma mia actor : गेम ऑफ थ्रोन्समध्ये महत्वाची भूमिका साकारणाऱ्या डेरेन केंट यांच्या निधनाची बातमी ताजी असतानाच हॉलीवूडला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. विकेड, मम्मा मिया सारख्या नाटकांमधून महत्वाची भूमिका साकारणाऱ्या ख्रिस पेलूसो या अभिनेत्याचे निधन झाले आहे.

वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी या अभिनेत्यानं अखेरचा श्वास घेतला आहे. ख्रिसच्या कुटूंबातील सदस्यांनी त्याच्या निधनाविषयीची माहिती सोशल मीडियावर दिल्याचे वृत्त आहे. ख्रिस हा त्याच्या वेगळ्या धाटणीच्या अभिनयासाठी प्रसिद्ध होता. त्याचा चाहतावर्गही मोठा होता. याशिवाय सोशल मीडियावर देखील तो त्याच्या वेगवेगळ्या पोस्टसाठी ओळखला जात असे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

द युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनमधून त्यानं त्याचे शिक्षण पूर्ण केले होते. युनिव्हर्सिटीनं त्याच्या निधनानंतर इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेयर केली आहे.त्यात ख्रिसच्या वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिला आहे. स्कूलचे म्युझिकल थिएटर प्रोग्रॅमचे अध्यक्ष लिंडा गुडरिच यांनी लिहिले आहे की, मिशिगन म्युझिकल थिएटरच्या कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे.

Chris Peluso death wicked and mamma mia actor
Ghoomer Review: एक हात नसला म्हणून काय झालं, मनात आणलं तर काहीही अशक्य नाही सांगणारा 'घूमर'

एक प्रतिभाशाली व्यक्तिमत्व आता आपल्यात नाही. याचे वाईट वाटते. ज्यानं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना निखळ आनंद दिला तो ख्रिस आता आपल्यात नाही. ख्रिसनं ब्रॉडवे वर मम्मा लिया, असेन्सिस लेटेस्ट, द ग्लोरियन्स वन्स आणि ब्युटीफुल सारख्या नाटकांमध्ये काम केले होते. ख्रिसच्या निधनाचे कारण अद्याप समोर आलेलं नाही.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ख्रिस हा गेल्या एका महिन्यापासून सीजोफेक्टिव्ह डिसऑर्डरनं त्रस्त होता. त्यानंतर त्याला रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. त्याच्या निधनानं अमेरिकन नाट्यविश्वाची मोठी हानी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.