shivaji satam birthday: 'सीआयडी'मधून घराघरात पोहोचलेला एक लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेते शिवाजी साटम. त्यांची 'सीआयडी' मधील एसीपी प्रद्युमन ही भूमिका असो वा 'दे धक्का'मधील तळीराम सूर्यभान जाधव.. त्यांची प्रत्येक भूमिका आपल्याला कायम लक्षात राहते.
तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे शिवाजी हे आधी बँकेत नोकरी करायचे..
अगदी सहजरित्या अभिनय करणाऱ्या या हरहुन्नरी कलाकाराचा आज वाढदिवस. शिवाजी साटम आज आपला 73 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांचा थोडक्यात जीवनप्रवास..
(cid fame actor Shivaji Satam birthday news bank job acting career movie serials )
आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. शिवाजी साटम यांचा जन्म २१ एप्रिल १९५० रोजी झाला. अभिनय क्षेत्रात येण्याआधी त्यांनी बँकेत नोकरी केली. त्यानंतर त्यांच्या अभिनयाची कारकीर्द १९७५ साली ‘रॉबिनहूड’ या मराठी बालनाट्यापासून झाली. 1980 मध्ये रिश्ते-नाते या लोकप्रिय मालिकेतून त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.
शिवाजींच्या अभिनयातील बारकावे आणि सहजपणा अनेक दिग्दर्शक आणि चित्रपट निर्मात्यांच्या पसंतीस पडला. 'वास्तव', 'गुलाम-ए-मुस्तफा', 'सूर्यवंशम', 'नायक', ‘ जिस देश मै गंगा रहता है’ या सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. तसेच मराठीमधील उत्तरायण, दे धक्का, मी शिवाजी पार्क या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. संगीत वरद या संगीत नाटकातील शिवाजींच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केले.
1998 मध्ये प्रदर्शित झालेली सीआयडी या मालिकेतील शिवाजी यांच्या ‘दया कुछ तो गडबड है’, दया तोड दो दरवाजा’, हे डायलॉग प्रचंड लोकप्रिय झाले. 2013 साली मालिका सोडून फक्त चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला पण प्रेक्षकांच्या आग्रहामुळे त्यांनी सीआयडीमध्ये पुन्हा काम करण्यास सुरूवात केली. शिवाजी साटम यांना 'ध्यानी मनी' या मराठी चित्रपटासाठी त्यांना महाराष्ट्र राज्याचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.