तामिळनाडूमध्ये आजपासून थिएटर सुरु, महाराष्ट्रात कधी?

देशाच्या वेगवेगळ्या भागात आता थिएटर theater सुरु झाले आहेत.
तामिळनाडूमध्ये आजपासून थिएटर सुरु, महाराष्ट्रात कधी?
Updated on

मुंबई - देशाच्या वेगवेगळ्या भागात आता थिएटर theater सुरु झाले आहेत. त्यापैकी तामिळनाडू tamilnadu state राज्यानं कोरोनाच्या नियमांचे पालन करुन थिएटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती तामिळनाडू प्रशासनानं दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार केव्हा थिएटर सुरु करणार असा प्रश्न कलाकारांकडून विचारला जातोय. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कलाकारांकडून सरकारला थिएटर सुरु करण्यासाठी मागण्यांचे निवेदन सादर केले जात आहे. लॉकडाऊन lockdown इतर अनेक सेवा, सुविधा सुरु झाल्या असताना मनोरंजन क्षेत्रालाही देखील सरकारनं दिलासा द्यावा. असे आवाहन कलाकारांनी केलं आहे.

साधारण पुढील आठवड्यापर्यत कलाकारांना दिलासा देण्याचा विचार प्रशासनाकडून केला जातोय. त्यांच्याकडे दिवसेंदिवस येणाऱ्या निवेदनांची संख्याही वाढलीय. दुसरीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता कमी असल्याचेही बोलले जात आहे. यापार्श्वभूमीवर सरकारनं महाराष्ट्रातील थिएटर सुरु करणार असल्याचे सांगितले आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता सरकारनं राज्यातील थिएटर आणि त्याची आकडेवारी घ्यायला सुरुवात केली आहे. यानिमित्तानं राज्य सरकार हे कलाकार मंडळीशी संवाद साधणार आहे. यापूर्वी काही कलाकारांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. लॉकडाऊनचा मोठा फटका मनोरंजन क्षेत्राला बसला होता. अनेक चित्रपटांचे प्रदर्शन रखडले होते. त्यामुळे त्यांना नाइलजानं ओटीटीचा पर्याय स्वीकारला होता. अनेक मोठ्या निर्मात्यांनी ओटीटीवर आपले चित्रपट प्रदर्शित केले होते. त्यालाही बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाल्याचे दिसुन आले आहे.

कानपूरमधील आयआयटीमधील एका शास्त्रज्ञानं दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता कमी असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात आपल्याला दिलासा मिळाला आहे. येत्या काळात थिएटर चालकांसाठी समाधानकारक निर्णय महाराष्ट्र प्रशासन घेणार आहे. त्याची बैठकही पुढील आठवड्यात होणार आहे. तामिळनाडू प्रशासनानं कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन काळजी घेण्याचे आवाहन थिएटर चालकांना केलं आहे. त्या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे. आम्ही आजपासून थिएटर सुरु करत असल्याची माहिती चैन्नईतील अल्बर्ट थिएटरचे मरियप्पन यांनी सांगितले आहे.

तामिळनाडूमध्ये आजपासून थिएटर सुरु, महाराष्ट्रात कधी?
Bigg Boss OTT: शिल्पा शेट्टीचा व्हिडीओ मेसेज पाहून शमिताला कोसळलं रडू

अक्षय कुमारचा बेल बॉटम हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट होता. त्या चित्रपटाकडून चाहत्यांना मोठ्या प्रमाणावर अपेक्षा होत्या. मात्र त्या पूर्ण करण्यात बेल बॉटम अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे. येत्या काळातही मोठमोठ्या बॅनरचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. मात्र ते थिएटरमध्ये प्रदर्शित होणार की ओटीटीवर याबाबत अजून संभ्रम आहे. त्यामुळे सरकारशी चर्चा करुन निर्माते, दिग्दर्शक निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.