Circuitt Movie Trailer: काळ आला की वेळही चुकत नाही.! 'सर्किट'चा ट्रेलर बघाच!

भय, थरार आणि दहशत घेऊन आलाय "सर्किट"चा रोमांचक ट्रेलर!
circuitt movie official trailer out cast vaibhav tatwawadi hruta durgule
circuitt movie official trailer out cast vaibhav tatwawadi hruta durgulesakal
Updated on

Circuitt Movie Trailer: गेली काही दिवस प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला गेली होती, कारण 'सर्किट' चित्रपटाचा ट्रेलर कधी येतोय याची सारेच वाट पाहत होते. अखेर तो दिवस आला आहे. हृता दुर्गुळे आणि वैभव तत्ववादी यांची प्रमुख भूमिका असलेला 'सर्किट' चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर आला आहे.

हाय व्होल्टेज ड्रामा आणि रोमान्स असलेल्या सर्किट या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला. चित्रपटाच्या टीजरमधून निर्माण झालेली उत्सुकता आता ट्रेलरमधून वाढली असून हा चित्रपट ७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

(circuitt movie official trailer out cast vaibhav tatwawadi hruta durgule)

circuitt movie official trailer out cast vaibhav tatwawadi hruta durgule
Sharad Ponkshe: सहावीत शिकणारा मुलगा काल हे विचार घेऊन.. शरद पोंक्षे यांची पोस्ट चर्चेत

भांडारकर एंटरटेन्मेंट आणि पराग मेहता प्रस्तुत "सर्किट" या चित्रपटाची निर्मिती मधुर भांडारकर, फिनिक्स प्रॉडक्शनच्या पराग मेहता, अमित डोगरा आणि देवी सातेरी प्रॉडक्शनच्या प्रभाकर परब यांनी केली आहे.

स्वरूप स्टुडिओचे सचिन नारकर, विकास पवार तर फिनिक्स प्रॉडक्शनचे अल्पेश गेहलोत, कीर्ति पेंढारकर, आकाश त्रिवेदी, मनोज जैन, मोहित लालवाणी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. आकाश पेंढारकर यांनी या चित्रपटातून आपले दिग्दर्शकीय पदार्पण केलं आहे.

आनंद पेंढारकर, जितेंद्र जोशी यांनी गीतलेखन, तर अभिजीत कवठाळकर यांचं श्रवणीय संगीत या चित्रपटाला लाभलं आहे. संजय जमखंडी यांनी रुपांतरित कथा आणि संवाद लेखन, शब्बीर नाईक यांनी छायांकन, तर अतुल साळवे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून जबाबदारी निभावलीय.

आतापर्यंत टीझरमध्ये वैभव तत्त्ववादी, हृता दुर्गुळे, रमेश परदेशी यांची भूमिका आपल्याला पहायला मिळाली होती आणि आता ट्रेलरमध्ये अभिनेते मिलिंद शिंदे यांची दमदार एंट्री झाली आहे.

वैभवनं या चित्रपटातील भूमिकेसाठी मेहनत घेऊन सिक्स पॅक बॉडी केली आहे. या लुकचं खूप कौतुकही झालं आहे. पण वैभवच्या या सिक्स पॅक लुकचं महत्त्व चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलरमधून दिसतं. त्यामुळे रोमान्स आणि तगडी अॅक्शन या चित्रपटात आहे.

सतत वैतागणाऱ्या, चिडणाऱ्या तरुणाची गोष्ट या चित्रपटात असल्याचं ट्रेलरमधून कळतं. पण तो असा का आहे? त्याच्यावर सतत मारधार करण्याची वेळ का येते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं प्रत्यक्ष चित्रपटातच मिळतील. त्यामुळे आता केवळ काहीच दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. ७ एप्रिलला "सर्किट" सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()