संगीत अवकाशातील मुख्य तारा निखळला! उस्ताद राशीद खान यांच्या निधनानंतर हार्मोनियम वादकानं जागवल्या आठवणी

प्रख्यात शास्त्रीय गायक उस्ताद राशीद खान (Classical Singer Rashid Khan) यांचे काल (मंगळवार) निधन झाले.
Classical singer Rashid Khan passes away
Classical singer Rashid Khan passes awayesakal
Updated on
Summary

'त्यांनी पहिला ‘सा’ लावला तरी लोक घायाळ व्हायचे. हृदय पाणी पाणी व्हायचे. इतका दैवी आवाज होता. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.'

सांगली : प्रख्यात शास्त्रीय गायक उस्ताद राशीद खान (Classical Singer Rashid Khan) यांचे काल (मंगळवार) निधन झाले. दोन वर्षांपूर्वी त्यांनी सांगलीत पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवात दीड तास स्वर्गीय अनुभव दिला होता. त्यांच्याविषयी भावना जागवताना सांगलीतील प्रख्यात हार्मोनियम वादक मिलिंद कुलकर्णी यांनी ‘संगीत अवकाशातील मुख्य तारा निखळला,’ अशा शब्दांत श्रद्धांजली वाहिली.

कुलकर्णी यांनी अनेक मैफलीत राशीद खान यांना संगीतसाथ केली होती. प्रख्यात हार्मोनियम (Harmonium) वादक मिलिंद कुलकर्णी म्हणाले, ‘‘राशीदभाई म्हणजे शास्त्रीय संगीतातील एक युग होते. त्यांच्यामुळे शास्त्रीय संगीताला वेगळी दिशा मिळाली.

Classical singer Rashid Khan passes away
Ustad Rashid Khan Died: उस्ताद राशिद खान यांचे वयाच्या 55 व्या वर्षी निधन

स्वतः पं. भीमसेन जोशी म्हणाले होती, की माझ्यानंतर गादी चालवणारे उस्ताद राशीद खान असतील. त्यांच्या आवाजाने बॉलिवूडला भुरळ पाडली. त्यांच्या मैफलीत या गाण्यांची फर्माईश व्हायची. त्यांचा आवाज इतका हृदयस्पर्शी होता, की त्यांनी पहिला ‘सा’ लावला तरी लोक घायाळ व्हायचे. हृदय पाणी पाणी व्हायचे. इतका दैवी आवाज होता. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ‘टायटॅनिक’ बुडल्यानंतर जी हळहळ झाली होती, तशी हळहळ आज होते आहे. हे त्यांचे जाण्याचे वय नव्हते.’’

ते म्हणाले, ‘‘सांगलीत ते जेव्हा आले, तेव्हा खूप साधेपणाने ते राहिले. त्यांचा आदर सत्कार करण्यात कमी पडू अशी भीती होती, पण त्यांनी ते जाणवूच दिले नाही. त्यांची तब्येत तेव्हाही ठीक नव्हती, मात्र खास आग्रहास्तव आले. स्‍वर्गीय अनुभव दिला. मी हार्मोनियम वाजवत होतो, माझा सुरांचा काही प्रॉब्लेम झाला. मी सूर दाबून ठेवला होता, हात काढल्याशिवाय दुरुस्ती शक्य नव्हती.

Classical singer Rashid Khan passes away
Ustad Rashid khan passed away : पंडित भीमसेन जोशींची भविष्यवाणी राशिद खान यांनी खरी ठरवली!

उस्तादांनी तेव्हा स्वतः हार्मोनियमचा भाता दुरुस्त केला. त्यांचा सत्कार करायचा होता, तानपुरे लावले होते.पलीकडे तुतारी वाजवणारे होते, तुतारीच्या आवाजाने उस्तादजी डिस्टर्ब होऊ नयेत म्हणून मी तुतारी वाजवू नका, अशी खूण केली. उस्तादजी म्हणाले, ‘अरे नको अडवू, तेही कलाकार आहेत.’ एवढे मोठे मन होते त्यांचे. गायकीचा, विद्येचा गर्व त्यांना झाला नाही. सुरांचा बादशहा हरपला. अवकाशातील मुख्य तारा निखळला आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.