CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सोमवारी रात्री अचानक केईएम हॉस्पीटलला भेट दिली. मुख्यमंत्र्यांच्या या अचानक भेटीची सध्या चांगलीच चर्चा रंगलीय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणतीही पुर्वकल्पना न देता मुंबईच्या केईएम हॉस्पीटलला ही भेट दिल्याने आरोग्य अधिकारी आणि हॉस्पीटलचे कर्मचारी यांची चांगलीच तारांबळ उडाली. अशातच मराठमोळा अभिनेता अभिजीत केळकरने मात्र मुख्यमंत्र्यांच्या भेटीचं कौतुक केलंय.
(cm eknath shinde surprise visit on kem hospital mumbai abhijeet kelkar marathi actor praised cm shinde)
अभिजीत केळकरने या शब्दात केलं मुख्यमंत्र्यांचं कौतुक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केईएम हॉस्पीटलमध्ये जी भेट दिली त्याचा व्हिडीओ अभिजीतने त्याच्या सोशल मिडीयावर शेअर केला.
हा व्हिडीओ शेअर करत अभिजीत म्हणाला.. इतक्या ग्राऊंड लेव्हलला काम करणारे पहिलेच मुख्यमंत्री अशा शब्दात अभिजीतने CM शिंदेंच्या केईएम रुग्णालयातील भेटीचं कौतुक केलंय
ठाण्यात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणुन खबरदारी
मुख्यमंत्र्यांनी याठिकाणी डॉक्टरांची, कर्मचाऱ्यांची भेट घेतली. सर्व सोयी सुविधांची पाहणी केली. मुख्यमंत्री याठिकाणी एका कार्यक्रमानिमित्त आले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी अचानक केईएम हॉस्पिटलकडे मोर्चा वळवला. शिंदे एकदमच हॉस्पिटलमध्ये आल्याने अनेकांची धांदल उडाल्याचं पाहायला मिळालं. हॉस्पिटलमधील सोयीसुविधा, उपकरणे यांची त्यांनी पाहणी केली.
ठाण्यातील कळवा हॉस्पिटलमध्ये २४ तासांमध्ये १८ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यावरुन राज्यात एकच खळबळ उडाली. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ही घटना घडल्यामुळे विरोधकांनी याला चांगलंच लावून धरलं. याप्रकरणात शिंदेंनी १० दिवसात अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. याच संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या केईएम हॉस्पिटलच्या भेटीकडे पाहिलं जातंय.
पुन्हा एकदा पाहणीला येणार असल्याचा मुख्यमंत्र्यांचा इशाारा
जनरल वाॅर्ड, आयसीयू, मध्ये भेट देऊन रुग्णांच्या नातेवाईकांशी चर्चा केली. शिवाय, केईएमच्या आयसीयु विभागाचे कौतुक करत नातेवाईक ही उपचारांबद्दल समाधान व्यक्त करत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. यासह बंद असलेले ६ वाॅर्डची पाहणी देखील केली. बंद असलेल्या वाॅर्ड मुळे ४०० ते ४५० रुग्णांचे अॅडमिशन इथे होत नाही. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. युद्धपातळीवर या सहा वाॅर्डचे काम सुरु करुन आठवड्याभरात पुन्हा एकदा पाहणीसाठी येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.