Kapil Sharma: "पायलट ट्रॅफीकमध्ये अडकलाय?" कपिल शर्माचा इंडिगो एअरलाईन्सवर संताप, जाणून घ्या प्रकरण

कपिलने इंडिगो एअरलाईन्सला टॅग करत तीव्र नाराजी व्यक्त केलीय
Comedian Kapil Sharma slams IndiGo over delay flight and Poor management
Comedian Kapil Sharma slams IndiGo over delay flight and Poor management SAKAL
Updated on

Kapil Sharma News: कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माने बुधवारी इंडिगो एअरलाईन्सविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केलाय.

इंडिगो एअरलाईन्सच्या ढिसाळ नियोजनाबद्दल कपिल शर्माने सोशल मीडियावर आवाज उठवला आहे.

ज्या प्रवाशांना चालता येत नव्हते आणि जे प्रवासी "व्हीलचेअरवर" आहेत अशा प्रवाशांना ताटकळत ठेवल्याने कपिलने इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांना फटकारले. काय घडलं जाणून घ्या.

Comedian Kapil Sharma slams IndiGo over delay flight and Poor management
Akshay Kelkar: मराठी अभिनेत्याला लागली म्हाडाची लॉटरी, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला, "हे सगळं स्वप्नवत..."

कपिलने एअरलाइनवर प्रवाशांना शटल बसमध्ये सुमारे एक तास थांबायला लावल्याचा आरोप केला आहे. याशिवाय "पायलट ट्रॅफिकमध्ये अडकला आहे" असं विचित्र कारण एअरलाईन्सतर्फे सांगण्यात आलंय.

कपिल शर्माने इंडिगोच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशांशी एअरलाइन स्टाफ जो वाद घालतोय त्याचा व्हिडीओही शेअर केलाय.

कपिलने व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की, "प्रिय इंडिगो, आधी तुम्ही आम्हाला ५० मिनिटे बसमध्ये थांबायला लावले, आणि आता तुमची टीम म्हणतेय पायलट ट्रॅफिकमध्ये अडकला आहे, काय? खरंच? आम्हाला रात्री ८ वाजता टेक ऑफ करायचा होता आणि ९:२० वाजले आहेत. अजून, कॉकपिटमध्ये पायलट नाही, तुम्हाला असे वाटते का की, हे 180 प्रवासी इंडिगोमध्ये पुन्हा प्रवास करतील? कधीच नाही,” कपिल शर्माने X वर शेअर केले.

Comedian Kapil Sharma slams IndiGo over delay flight and Poor management
Sam Bahadur: 'सॅम बहादूर'च्या पोस्टरसमोर रेखा यांनी असं काय केलं की सर्वत्र होतंय त्यांचं कौतुक

पुढे आणखी एक व्हिडीओ शेअर करत कपिल म्हणाला, "आता ते सर्व प्रवाशांना डी-बोर्डिंग करुन, आम्हाला दुसर्‍या विमानात पाठवायला सांगत आहेत. पण या सगळ्या गोंधळात पुन्हा आम्हाला सुरक्षा तपासणीसाठी टर्मिनलवर परत जावे लागेल."

"तुमच्या आणि इंडिगोच्या खोटं बोलण्यामुळे लोकांना त्रास होत आहे. व्हीलचेअरवर बसलेले काही वयस्क प्रवासी आहेत, त्यांची तब्येत फारशी चांगली नाही. तुम्हाला लाज वाटते का?" अशा शब्दात कपिलने इंडिगोला खडे बोल सुनावले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.