तोंड बंद ठेवा.. कारण मोदींची नक्कल करणं गुन्हा आहे; तब्बल पाच वर्षांनी श्याम रंगीला ने मांडली खंत

केंद्र सरकारमध्ये भाजपची सत्ता आल्यापासून नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या विषयी भाष्य करणाऱ्यांवर निर्बंध आणल्याची तक्रार वारंवार समोर येतेय. कॉमेडियन श्याम रंगीला याने तब्बल पाच वर्षांनी याविषयी भाष्य केले आहे. तो म्हणाला...
shyam rangeela on narendra modi
shyam rangeela on narendra modisakal
Updated on

कलाकार केवळ एका विशिष्ट पठडीत कला सादर करून रसिकांचे मनोरंजन करत नाही. तो सृजनशील असल्याने त्याच्या प्रतिभेने तात्कालीन सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितीवर भाष्य देखील करत असतो. असे अनेक कलाकार होऊन गेले ज्यांनी त्या त्या वेळी सत्तेत असणाऱ्या नेत्यांना खडेबोल सुनावले आहे. महाराष्ट्रात तर याची मोठी परंपरा आहे. पु. ल. देशपांडे, आचार्य अत्रे ते अगदी अलीकडचे अशोक नायगावकर यांसारखे अनेक लेखक कवी सरकारला त्यांच्या चुका दाखवत असतात. परंतु गेल्या काही वर्षांपासून हे सत्ताधाऱ्यांवर टीका करणं हा गुन्हा असल्याची खंत समोर येत आहे.

shyam rangeela on narendra modi
ईशा केसकर मोठ्या भूमिकेत; साकारणार सईबाई राणी सरकार..

२०१४ मध्ये आपण ६० वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसला बाजूला करून सर्व सत्ता भाजपच्या हाती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) यांच्याकडे देश मोठ्या आशेने पाहत होता. पण गेल्या काही वर्षातील देशातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती बदलली असून त्यावर भाष्य करण्यासाठी अनेकजण पुढे येत आहेत. पण या कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर यंत्रणांकडून बंधनं आणली जात असल्याचा आरोप गेल्या काही वर्षांपासून होत आहे.

shyam rangeela on narendra modi
अपघातानंतर मलायका अरोरा पहिल्यांदाच कॅमेऱ्यात कैद, म्हणाली...

हा आरोप विशेषकरून भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर होत आहे. या आधी कुणाल कामरा आणि मुन्नवर फारुकी यांसारख्या अनेक कलाकारांना याचा अनुभव आला आहे. याच अनुभवातून गेलेला श्याम रंगीला (shyam rangeela) तब्बल पाच वर्षांनी याविषयी व्यक्त झाला आहे. मोदींविषयी भाष्य केल्यामुळे त्यांच्या कार्यक्रमांवर बंदी आणली होती. याविषयी आज त्याने ट्विट करून निषेध व्यक्त केला आहे. shyam rangeela twits on narendra modi.

तो म्हणतो, 'प्रिय नरेंद्र मोदी, मी एक सामान्य कलाकार आहे. मी तुमच्यासह अनेकांची मिमिक्री करतो. पण हि मिमिक्री मी टीव्ही चॅनेल वर खुलेपणाने करू शकत नाही हे माझं दुःख आहे. कारण चॅनेलवाले तुम्हाला घाबरतात. तुम्हाला तर मस्करी आवडते मग का बरं हे तुम्हाला घाबरत असतील तुमच्यावरील मिमिक्रीला ? तुमची नक्कल करणं (मिमिक्री) हा गुन्हा आहे का?' (your mimicry is crime?)

'लाफ्टर चॅलेंज (२०१७) नंतर अनेकदा वेगवगेळ चॅनेल वरील कार्यक्रमांसाठी बोलणं झाल पण त्यांनी शेवटी एकाच उत्तर दिलं, 'श्याम चॅनेल तुझ्या नावाला परवानगी देत नाही.' आज पुन्हा त्याचा अनुभव आला म्हणून तब्बल ५ वर्षांनी हे मला नाईलाजाने लिहावं लागतंय. मिमिक्रीला एवढं का घाबरता तुम्ही?.. सोशल मिडिया नसता तर हा रंगीला कधीच संपला असता.. ' असे दुःख श्याम याने मांडलं आहे. (why is everyone so afraid of mimicry?)

shyam rangeela on narendra modi
काँडम कंपनीकडून रणबीर आलियाला खास शुभेच्छा; म्हणाले 'आमच्याशिवाय..'

पुढे तो म्हणतो... 'एखाद्या चॅनेलच्या कार्यक्रमात मिळणार नाही एवढं प्रेम लोकांनी मला सोशल मिडियावर दिलं, म्हणून तुमचा मी आभारी आहे. पण भीती पोटी टीव्ही चॅनेल आपल्याला कसं दूर ठेवतात, हे माझ्या सारख्या नवोदित कलाकारांनी लक्षात ठेवायला हवं. कुठल्याशा कार्यक्रमात मला संधी मिळावी किंवा माझ्याप्रती कुणाला सहानुभूती वाटावी म्हणून मी हे लिहीत नाहीय, तर जे सत्य आहे तेच मांडतोय.' शेवटी त्याने सर्वांना आवाहन केले आहे. श्याम लिहितो, 'बाबांनो, महागाई वर इथून पुढेही तुम्ही तुमचं तोंड बंदच ठेवा. कारण हा नवा भारत आहे. इथे तुम्हाला क्षणाचीही संधी देणार नाहीत.'असे ट्विट त्याने केले आहे.त्यांच्या या विधानाने खळबळ माजली असून अनेकांनी त्यांचे समर्थन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()