कंगनाला दिलासा! चित्रिकरणासाठी परदेशात जाण्याचा मार्ग मोकळा

पासपोर्ट नुतनीकरण प्रकरणी कंगनाला दिलासा
kangana-ranaut
kangana-ranaut
Updated on

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हीच्या पासपोर्टवर जलदीने सुनावणी घेण्याची हमी पारपत्र विभागाकडून आज मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. यामुळे कंगनाला दिलासा मिळाला आहे. पासपोर्ट नुतनीकरणाला उशीर होत असल्याची तक्रार कंगनाने हायकोर्टात अर्जाद्वारे केली होती. (Comfort to Kangana Kangana Ranaut passport renewal application will be expeditiously)

kangana-ranaut
T20 वर्ल्डकप भारतात नव्हे UAE ला होणार; BCCIचं शिक्कामोर्तब!

धाकड सिनेमासाठी कंगनाला हंगेरीमध्ये चित्रिकरण करण्यासाठी जायचे आहे. मात्र, तिच्या पासपोर्टचे नूतनीकरण अद्याप करण्यात आलेले नाही. तिच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये पोलिसांनी देशद्रोहाचा आरोप केला आहे. यामुळे पासपोर्ट नूतनीकरण होत नाही, असे सांगणारी याचिका तिच्यावतीने अॅड. रिझवान सिद्दीकी यांनी केली आहे. याचिकेवर आज न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. जी. ए. सानप यांच्या पुढे सुनावणी झाली.

kangana-ranaut
कोरोनाच्या म्युटेड होणाऱ्या व्हायरसवर तात्याराव लहाने म्हणाले...

कंगंना विरोधात न्यायालयात एकही खटला प्रलंबित नाही, असे विधान तिच्यावतीने करण्यात आले तर पासपोर्ट अर्जावर कायद्यानुसार शक्य तितक्या जलदीने सुनावणी होऊ शकेल असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी सांगितले. सिद्दीकी यांनी याप्रकारचे लेखी विधान दाखल केले. तसेच अर्जामध्येही याची नोंद करण्याची हमी दिली. न्यायालयाने हे नोंदवून घेतले आणि याचिका निकाली काढली.

kangana-ranaut
'आप' जिंकल्यास पंजाबला मोफत वीज; केजरीवालांचं आश्वासन

धाकड सिनेमावर हंगेरीमध्ये चित्रिकरण सुरू झाले असून कंगना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे तिला तातडीने हंगेरीमध्ये जायचे आहे. खार आणि वांद्रे पोलीस ठाण्यात तिच्या विरोधात फौजदारी तक्रारी दाखल झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.