Ranbir Kapoor Video: रणबीर कपूरविरुद्ध तक्रार! धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

रणबीर कपूरच्या 'त्या' व्हिडीओविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आलीय
Complaint filed against actor Ranbir Kapoor in Mumbai for “hurting religious sentiments”
Complaint filed against actor Ranbir Kapoor in Mumbai for “hurting religious sentiments”SAKAL
Updated on

Ranbir Kapoor Video News: बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या 'अॅनिमल' या चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. अशातच रणबीर कपूरचा एक व्हिडीओ चांगला व्हायरल झाला.

रणबीरने त्याच्या कुटुंबासह ख्रिसमस साजरा करताना दिसला. रणबीर कपूरचा ख्रिसमस सेलिब्रेशनच्या एका व्हिडिओमुळे चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओतील रणबीर ख्रिसमस साजरा करताना जय माता दी असं म्हणतो. आता रणबीरविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Complaint filed against actor Ranbir Kapoor in Mumbai for “hurting religious sentiments”
Bhau Kadam - Devendra Fadanvis: आणि फडणवीसांनी भाऊंना कडकडून मिठी मारली, व्हिडीओ व्हायरल

व्हायरल व्हिडिओ पाहून नेटिझन्स संतापले

रणबीर कपूरच्या ख्रिसमस सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या क्लिपमध्ये रणबीर 'जय माता दी'चा जयघोष करत केकवर दारू ओततो आणि त्याला आग लावतो. नेटिझन्सना त्याची ही कृती अजिबात आवडली नाही.

रणबीरवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप होत आहे. याशिवाय सोशल मीडियावरही त्याला खूप ट्रोल केले जात आहे. धार्मिक भावना दुखावल्या!

रणबीरविरोधात तक्रार दाखल

रणबीरविरोधात बुधवारी मुंबईतील घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तथापि, या प्रकरणात अद्याप कोणताही प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आलेला नाही.

वकील आशिष राय आणि पंकज मिश्रा यांच्यामार्फत घाटकोपर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणारे संजय तिवारी यांनी दावा केला आहे की. व्हिडिओमध्ये अभिनेता जय माता दी म्हणत केकवर दारू ओतताना आणि आग लावताना दिसत आहे.

काय आहे तक्रार?

पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, हिंदू धर्मात इतर देवतांचे आर्जव करण्यापूर्वी अग्निदेवतेचे आवाहन केले जाते, परंतु कपूर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी जाणूनबुजून अमली पदार्थाचा वापर केला आणि दुसर्‍या धर्माचा सण साजरा करताना जय माता दीचा नारा दिला. यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.