Carry On Jatta 3: हिंदूंच्या भावना दुखावल्या! पुन्हा एका चित्रपटाबाबत वाद, निर्माते आणि कलाकारांविरोधात तक्रार दाखल

Carry On Jatta 3:
Carry On Jatta 3: Esakal
Updated on

Complaint Filed Against Carry On Jatta 3:  चित्रपट आणि वाद हे जणु समीकरणचं झालेलं आहे. चित्रपट रिलिज होण्यापुर्वीच तो वादात अडकतो आणि त्याविरोधात तक्रार दाखल केली जाते. असचं काहीस 'कॅरी ऑन जट्टा 3' बाबतीत घडलं आहे.

'कॅरी ऑन जट्टा 3' चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकार हे आता कायदेशीर वादात अडकले आहेत. शिवसेना हिंद युवा समितीचे अध्यक्ष इशांत शर्मा आणि पंजाब शिवसेना (टकसाली) चे अध्यक्ष सुनील कुमार बंटी यांनी त्यांच्याविरोधात जालंधर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.

Carry On Jatta 3:
Satya Prem Ki Katha: महाराष्ट्राचं राजकारण मनोरंजक झालेलं असतांना कार्तिक कियाराच्या चित्रपटाच्या कमाईत जबरी वाढ!

पंजाब शिवसेना अध्यक्ष सुनील कुमार बंटी यांनी या चित्रपटामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत ,कारवाई करून तो सीन हटवण्याची मागणी केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, पंजाब शिवसेनेचे अध्यक्ष सुनील कुमार बंटी यांनी सांगितले की, "आम्ही शिवसेना हिंदच्या वतीने तक्रार दाखल केली आहे. कारण 'कॅरी ऑन जट्टा 3' हा चित्रपट हिंदूंवर केंद्रित आहे. धार्मिक विधी करताना पाहिले जाऊ शकते. एका दृश्यात त्यांनी अपमान केला आहे.

Carry On Jatta 3:
Maharashtra Politics: महाराष्ट्राचं राजकारण कमी, गजकर्ण जास्त.. कोकण हार्टेड गर्लची पोस्ट व्हायरल

या चित्रपटात एक दृश्य आहे ज्यामध्ये एक ब्राह्मण हवन करताना दिसत आहे, त्याचा अपमान केला जात आहे. गिप्पी ग्रेवाल, बिन्नू ढिल्लन आणि गुरप्रीत घुग्गी यांनी हवन कुंडावर पाणी फेकून लाखो हिंदूंच्या श्रद्धा दुखावल्या आहेत. कारण हिंदू धर्मात कोणताही विधी करायचा असेल तर आधी हवन केला जातो.

या सीनमुळे हिंदूच्या भावना दुखावल्या गेल्यामुळे त्याच्यावर कार्यवाही करण्यात यावी आणि कलम 295 आणि 153 या कलामांतर्गत कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Carry On Jatta 3:
Colors KKK 13 : खतरो के खिलाडी 13 च्या सेटवर शिव ठाकरे गंभीर जखमी, हाताला टाके, बघा काय घडलं

पुढे सुनील कुमार बंटी म्हणतात की, 'हे लोक हिंदू धर्माला टार्गेट करतात. त्याच्या चित्रपटाचा टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न करतात. हे इतर कोणत्याही जातीच्या बाबतीत घडले असते तर त्यांनी थिएटर नष्ट केले असते किंवा आग लावली असती.

हिंदू धर्म हा अतिशय मवाळ धर्म आहे, म्हणून आम्ही आधी सरकारकडे गेलो. 24 तासांत कारवाई झाली नाही, तर दिग्दर्शक समीप कांग आणि गुरप्रीत घुग्गीचे घर जालंधरमध्येच आहे. त्यांच्या घराबाहेर ते आंदोलन करणार आहे.'

समीप कांग दिग्दर्शित 'कॅरी ऑन जट्टा 3' 29 जून रोजी रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.