'83'च्या निर्मात्यांसह दीपिका पदुकोणविरोधात तक्रार दाखल

चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात फसवणुकीचा आरोप
Kabir Khan Deepika Padukone and Ranveer Singh
Kabir Khan Deepika Padukone and Ranveer Singh
Updated on

अभिनेता रणवीर सिंगची (Ranveer Singh) मुख्य भूमिका असलेला '83' हा चित्रपट अडचणीत सापडला आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणचाही (Deepika Padukone) समावेश आहे. दीपिकासुद्धा या चित्रपटांच्या निर्मात्यांपैकी एक असल्याने तीसुद्धा वादात सापडली आहे. 'इंडिया टुडे'नं दिलेल्या वृत्तानुसार, संयुक्त अरब अमिरातीमधील एका गुंतवणूकदाराने मुंबईतील अंधेरी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात संपर्क साधला आणि '83'च्या निर्मात्यांविरुद्ध तक्रार दाखल केली.

संबंधित तक्रारदाराच्या कंपनीने सुमारे १६ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर विब्री मीडियाने त्यांना चांगला परतावा देण्याचं वचन दिलं होतं, असं त्यांनी म्हटलंय. मात्र तो निधी कोणत्याही लेखी संमतीशिवाय कबीर खान, साजिद नाडियादवाला आणि दीपिका पदुकोण यांच्या '83' या चित्रपटाच्या निर्मितीसाठी वापरला गेला, असा आरोप तक्रारदाराने केला आहे. तक्रारदाराने फसवणूक आणि गुन्हेगारी कटाचा आरोप करत '83'च्या निर्मात्यांविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल केल्याची माहिती वकील रिजवान सिद्दिकी यांनी दिली.

Kabir Khan Deepika Padukone and Ranveer Singh
कतरिनाच्या साखरपुड्याच्या अंगठीने वेधलं लक्ष; जाणून घ्या किंमत..

कबीर खान दिग्दर्शित '83' हा चित्रपट 1983 च्या विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाच्या कहाणीवर आधारित आहे. या रिअल लाईफ ड्रामामध्ये रणवीर हा कपिल देव यांची भूमिका तर त्याची पत्नी दीपिका ही कपिल देव यांची पत्नी रुमी भाटिया यांची भूमिका साकारत आहे. याशिवाय पंकज त्रिपाठी, ताहिर राज भसीन, जिवा, साकिब सलीम, जतीन सरना, चिराग पाटील, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर आणि एमी विर्क यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट २४ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.