Har Har Mahadev: ‘हर हर महादेव’ अशी गगनभेदी गर्जना करत झी स्टुडियोजच्या ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा ट्रेलर आला आणि तमाम प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याची गाथा सांगणारा हा चित्रपट अवघ्या दोन दिवसात प्रदर्शित होणार आहे. पण प्रदर्शनाआधीच चित्रपटाला ग्रहण लागले आहे. या चित्रपटावर आक्षेप घेतला असून चुकीचा इतिहास सांगितला जात असल्याची तक्रार बांदल वंशजांनी केली आहे. या बाबत एक विस्तृत पत्र त्यांनी दिले आहे.
(Controversy about movie har har mahadev objection about historical facts in trailer)
अभिजीत देशपांडे यांच्या लेखन आणि दिग्दर्शनातून तयार झालेला आणि झी स्टुडिओची निर्मिती असलेला हा चित्रपट चुकीच्या इतिहासावर आधारित असल्याचा दावा सरदार कृष्णाजी राजे बांदल देशमुख यांनी केला. या संदर्भात एक विस्तृत पत्र त्यांनी जाहीर केले आहे.
या पत्रात म्हंटले आहे की, ''राजमाता जिजाऊंच्या भूमिकेत असलेल्या निशिगंधा वाड यांच्या तोंडून टिझर मध्ये आलेले वाक्य 'प्रभूरामाला जसे हनुमंत होते तसे शिवबाला हा बाजी' हे वाक्य इतिहासाला धरून नाही. 'हनुमंत अंगद रघुनाथाला, जेधे बांदल शिवाजीला' हे वर्णन जेधे मध्ये नमूद आहे. ''
पुढे ते लिहितात, ''ट्रेलर मध्ये दाखविल्या प्रमाणे जाही सरदार येऊन संबंधित दुसऱ्या सरदाराकडे शिवाजी महाराज यांच्या विरुद्ध लढण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांची मागणी करतात. टीप - बारा मावळ मध्ये बाजीप्रभू देशपांडे हे हिरडस मावळातील सरदार 'बाजी बांदल देशमुख' यांच्या दरबारी पिढीजात 'देश कुलकर्णी' म्हणून आपले काम बजावत होते. काही ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये बाजीप्रभू देशपांडे यांचा उल्लेख सरनोबत असाही आढळतो. त्यामुळे ट्रेलर मध्ये तुम्ही कोणते पात्र दाखवले आहे.''
''ट्रेलर मध्ये दाखवलेले बाजीप्रभू यांच्या तोंडी, मला शिवाजी शहाजी भोसले यांचा जीव घ्यायचा आहे ही वाक्य इतिहासाचे विकृतीकरण करणारे आणि इतिहासाला कालिमा फसणारे आहे. तसेच जनतेची दिशाभूल करणारे आहे. दिग्दर्शक आणि लेखक धंदा करण्याच्या नादात जो चुकीचा इतिहास दाखवत आहेत त्यामुळे समस्त इतिहास प्रेमींच्या आणि 'बांदल घराण्याच्या' भावना दुखावल्या गेल्या आहेत.''
''ट्रेलर मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे एकमेकांशी लढताना दाखवले आहेत. त्याला कोणताही ऐतिहासिक आधार नाही. लढाई मधील संवाद 'मी बरे आणि माझे बांदल बरे' हा बाजीप्रभू यांना स्वराज्यद्रोही ठरवतो. टीप- शहाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य कार्य आरंभले होते त्या काळातच बांदल घराणे महाराजांसोबत स्वराज्यात सामील झाले होते.'' या पत्राने आता खळबळ माजवली असून 'हर हर महादेव'चे प्रदर्शन धोक्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.