मुंबई- ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. आशालता यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. 'काळुबाईच्या नावाने चांगलभलं' या मालिकेत त्या सध्या काम करत आहेत. या मालिकेचं शूटींग साता-यात सुरु होतं.
'काळुबाईच्या नावाने चांगलभलं' या मालिकेचं शूटींग साता-यात सुरु होतं. या सेटवरील तब्बल २७ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर येतंय. मुंबईवरुन आलेल्या एका डान्स ग्रुपमुळे सेटवर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय. सोमवारी अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
साता-याजवळील वाई येथील हिंगोली गावात एक फार्महाऊसवर या मालिकेचं शूटींग सुरु होतं. आशातला या साता-यात शूटींग करत होत्या. मात्र गेल्या दोन दिवसांपासून त्यांना कोरोनाची लक्षणं जाणवू लागली होती. आज त्यांची प्रकृती जास्त बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सेटवर २७ जणांना कोरोनाची लागण झाल्याने साता-यातील शूटींग थांबवण्यात आलं होतं. मात्र यातील अनेक जण आता बरे होत असल्याने मुंबईत शूट सुरु करण्यात आलं आहे. मात्र आशालता या साता-यातंच आहेत.
काळुबाईच्या नावाने चांगभलं या मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल आहेत. कोरोनाच्या काळात शुटींगला परवानगी देण्यात आली असली तरी यादरम्यान नियमांचं पालन देखील महत्वाचं आहे. सेटवर नियमांचं पालन करत काळजी घेतली जात असताना देखील एवढ्या जणांना कोरोनाची बाधा कशी झाली यावर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय.
covid 19 veteran actress ashalta wabgaonkar on ventilator in hospital
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.