Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरनं केलं दिलीप प्रभावळकरांचं कौतुक, कारणही ठरलं खास

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने केलं ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकरांचं कौतुक
cricketer sachin tendulkar praised actor dilip prabhavalkar and panchak movie team
cricketer sachin tendulkar praised actor dilip prabhavalkar and panchak movie teamSAKAL
Updated on

Sachin Tendulkar - Dilip Prabhavalkar News: क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा अनेकदा मराठी कलाकारांचं कायम कौतुक असतं. काही महिन्यांपुर्वी सचिनने बाईपण भारी देवा सिनेमा पाहिला आणि सिनेमाचं कौतुक केलं.

अशातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचं कौतुक केलंय. कारण सुद्धा खास आहे. काय म्हणाला सचिन? म्हणाला..

(cricketer sachin tendulkar praised actor dilip prabhavalkar)

cricketer sachin tendulkar praised actor dilip prabhavalkar and panchak movie team
Prabha Atre Death: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रेंचं निधन, संगीतविश्वातला तारा निखळला

सचिन तेंडुलकरने केलं प्रभावळकरांचं कौतुक

सचिन तेंडुलकरने X वर ट्विट केलंय. यात तो लिहीतो, "अनेक कॅरेक्टर्स आणि त्याहूनही जास्त विनोदी. 'पंचक' हा फॅमिली बरोबर बघण्यासारखा आणि खूप खूप हसवणारा चित्रपट आहे. दिलीप प्रभावळकरांची ऍक्टिंग चित्रपटाला अजून समृद्ध करेल. निर्माते माधुरी दीक्षित आणि डॉक्टर नेने ह्यांना मराठी सिनेमाला प्रोत्साहन देण्यासाठी धन्यवाद!"

अशाप्रकारे सचिन तेंडुलकरने पंचक सिनेमा पाहिला असून त्याने दिलीप प्रभावळकरांचं कौतुक केलंय

पंचकची निर्मिती अभिनेत्री माधुरी दीक्षित यांची

चित्रपटाबद्दल माधुरी दीक्षित नेने म्हणतात, ''या चित्रपटाच्या क्रिएटिव्ह बाबींमध्ये मी विशेष लक्ष घातले आहे. पडद्यावरील आणि पडद्यामागील प्रत्येकाची निवड ही योग्य आहे. चित्रपट पाहताना याचा प्रत्यय प्रेक्षकांनाही नक्कीच येईल.

प्रत्येक कलाकार त्या व्यक्तिरेखेत चपखल बसला आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान थोड्या अडचणी आल्या परंतु आज जेव्हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे, तेव्हा मनाला समाधान मिळतेय. मला खात्री आहे, चित्रपटावर प्रेक्षक नक्कीच भरभरून प्रेम करतील.''

पंचक सिनेमाबद्दल थोडंसं..

जयंत जठार आणि राहुल आवटे दिग्दर्शित या पंचक चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत.

तर आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दिप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर हे प्रमुख भूमिकेत आहेत.

चित्रपटाचे लेखन राहुल आवटे यांनी केले आहे. पंचक ५ जानेवारी २०२४ ला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.