Crime Case: गुन्हे जगताशी जोडलेल्या प्रसिद्ध क्राइम पेट्रोलच्या(Crime Patrol) मालिकेच्या निर्मात्याला लुबाडल्याची मोठी बातमी आहे. मुंबईच्या मालाड पोलिस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बॉलीवूड सिनेमा 'गॅंग्ज ऑफ वासेपूर'चा लेखक आणि अभिनेता जीशान कादरीच्या विरोधात क्राइम पेट्रोलच्या निर्मात्यानं ३८ लाख रुपयाची ऑडी कार चोरल्याची तक्रार दाखल केली आहे. मुंबईत मालाड पोलिसांनी गुरुवारी 'क्राइम पेट्रोल डायल १०० 'च्या निर्मात्याच्या चोरीच्या तक्रारीला दाखल करुन घेतले आहे.(Crime Patrol producer is cheated by bollywood writer Of film gangs of Wasseypur)
आरोप आहे की जीशान कादरीनं ना फक्त निर्मात्याची कार उधारीवर चालवायला नेली, तर गेल्या एक वर्षापासून तो त्यांचा फोनही उचलत नाही. इतकंच नाही तर निर्मात्याच्या कारला कादरीनं १२ लाख घेऊन गहाण ठेवलं आहे. मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे कळत आहे की २२ जून २०२१ रोजी जीशान कादरीनं क्राइम पेट्रोलचे निर्माते राजबाला ढाका चौधरी यांच्या घरी येऊन त्यांचा मुलगा समीर चौधरीला एका कॉमेडी शो ची ऑफर दिली. तो कार्यक्रम सब टी.व्ही वर प्रसारित केला जाणार होता. त्यानंतर कादरीनं चौधरी यांना शो च्या निर्मितील पार्टनर म्हणून येण्याची ऑफर दिली. त्यानंतर त्यानं चौधरी यांना शो साठी फायनान्स करण्यास देखील मनवलं.
यानंतर शो संबंधित चॅनलचे मुख्य, शो चे दिग्दर्शक आणि कलाकारांसोबत मिटींग करण्यासाठी कादरीनं कार हवी असल्याचं सांगितलं. त्यानंतर कादरीनं चौधरी यांच्याकडे ऑडी कार उधार म्हणून मागितली. क्राइम पेट्रोलच्या निर्मात्यानं आपली कार कादरीला दिली. एक महिन्यानंतर चौधरी यांनी कार पुन्हा परत मागितली. कारण ती कार चौधरी यांनी कादरीला काही दिवसांसाठी दिली होती. पण चौधरींचा कारसाठी तगादा सुरु झाला तेव्हापासून कादरीनं त्यांचा फोन उचलणं बंद केलं आहे.
यानंतर जीशान कादरीने कधी फोन उचलला तरी काही ना काही बहाणा करुन विषय टाळायचा आणि फोन ठेवून द्यायचा. एक वर्ष झालं तरी कादरीनं कार परत केली नाही तेव्हा चौधरी यांनी कारचा तपास सुरु केला. तेव्हा जाऊन कळालं की कादरीनं निर्मात्याची कार आपल्या एका मैत्रिणीच्या मित्राकडे १२ लाख घेऊन गहाण ठेवली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.