Taran Adarsh on Bollywood: सध्या बॉलिवूड इंडस्ट्री ICU मध्ये... तरण आदर्शचं मोठं वक्तव्य

अगदी रणबीर कपूर, अजय देवगण यांचे सिनेमे सुद्धा सपशेल अपयशी ठरले आहेत.
ranbir kapoor, ajay devgan, taran adarsh, Taran Adarsh on Bollywood, pathaan, shah rukh khan
ranbir kapoor, ajay devgan, taran adarsh, Taran Adarsh on Bollywood, pathaan, shah rukh khanSAKAL
Updated on

Taran Adarsh on Bollywood News: गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड इंडस्ट्री विषयी अनेक बऱ्या वाईट प्रतिक्रिया येत आहेत. बॉलिवूडमध्ये भरमसाठ सिनेमे येऊनही अपेक्षित कामगिरी करण्यास सिनेमे अपयशी ठरत आहेत.

मागच्या काही दिवसांपासून शाहरुखचा पठाण सोडला तर बॉलिवूडचे अनेक सिनेमा अपेक्षित कामगिरी करण्यास अपयशी ठरले आहेत.

अगदी रणबीर कपूर, अजय देवगण यांचे सिनेमे सुद्धा सपशेल अपयशी ठरले आहेत. याच बॉलिवूड परिस्थितीवर लोकप्रिय सिने - समीक्षक आणि बिझनेस तज्ञ तरण आदर्शने प्रतिक्रिया दिली आहे.

(Currently Bollywood industry is in ICU... Taran Adarsh big statement about bollywood pathaan)

ranbir kapoor, ajay devgan, taran adarsh, Taran Adarsh on Bollywood, pathaan, shah rukh khan
Hruta Durgule चा नवऱ्यासोबत पॅरिसमध्ये रोमँटिक हनीमुन

तरण आदर्शने वक्तव्य केलंय की, “चित्रपट उद्योगाच्या व्यवसायासाठी हे खूप महत्वाचे आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चित्रपट थिएटरमध्ये टिकून राहणे.

कारण कोविड नंतर सिनेमे भयानक परिस्थितीत होते. चित्रपट उद्योग ICU आहे. एक शाहरुखचा पठाण सुपरहिट होतो पण तुम्हाला बॉलिवूड सुरक्षिततेकडे नेण्यासाठी तुम्ही खरोखर एका पठाणवर अवलंबून राहू शकत नाही.

तुम्हाला बॉक्स ऑफिसवर सुरक्षित राहण्यासाठी असे अनेक पठाण द्यावे लागतील; अन्यथा ते शक्य नाही"

तरण आदर्श पुढे म्हणाले, “तुमच्याकडे स्थानिक चित्रपट हवेत पण आपल्या चित्रपटांना यश मिळणे खूप महत्वाचे आहे कारण आपला चित्रपट उद्योग अतिशय नाजूक टप्प्यातून जात आहे.

आम्ही अत्यंत असुरक्षित टप्प्यातून जात आहोत त्यामुळे मला आशा आहे की निर्मात्यांना येत्या काही दिवसांमध्ये समजेल की तुम्हाला तुमच्या कथानकावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

ज्या सिनेमात स्टार कलाकार आहे तो सिनेमा प्रेक्षक बघायला जातील असं गृहीत धरणं चुकीचं आहे."

शाहरुखच्या पठाणने न भूतो न भविष्यती असा रेकॉर्ड ब्रेक गल्ला जमवला. पठाणने जगभरात तब्बल १००० कोटी इतका गल्ला जमवला. पठाण निमित्ताने शाहरुख खानने ४ वर्षांनी दमदार कमबॅक केलं.

पण पठाण नंतर आलेले अजय देवगणचा भोला, रणबीर कपूरचा तू झूठी मै मक्कार सिनेमांना मात्र अपेक्षित कामगिरी करता आली नाही. अलीकडेच प्रदर्शित झालेला द केरळ स्टोरी सिनेमा मात्र बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.