Birthday : दादांसाठी बाळासाहेबांनी दिले होते ‘मराठा मंदिर’वर राडा करण्याचे आदेश

त्याकाळी मुंबईमध्‍ये मराठी चित्रपट फक्त परळच्या ‘भारतमाता’ या सिनेमागृहात लागत असे
Dada Kondke Birthday News
Dada Kondke Birthday NewsDada Kondke Birthday News
Updated on

Dada Kondke Birthday सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेच्या निमित्ताने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव सतत चर्चेत आहे. दुसरीकडे दादा कोंडके यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि दादा कोंडके (Dada Kondke) यांच्‍यातील एक किस्सा चर्चेला जात आहे. कोणता आहे तो किस्सा हे आपण आज जाणून घेऊ या...

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, दादा कोंडके व शिवसेना यांच्‍यात विशिष्ट नाते होते. कारण, बाळासाहेब ठाकरे हे हिंदू आणि मराठी माणसांसाठी लढत होते. बाळासाहेबांचे मराठी प्रेम व रसिकतेमुळे दादा कोंडके यांच्यासोबत विशेष नाते जुळले. एकदा दादा कोंडके यांचा चित्रपट मुंबईमध्‍ये लावण्‍यात यावा यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना ‘मराठा मंदिर’वर राडा करण्‍यास सांगितले होते.

‘राम राम गंगाराम’ या चित्रपटाच्या वेळी दादा कोंडके (Dada Kondke) यांना दादरचे ‘मराठा मंदिर’ (Maratha Mandir) हवे होते. मात्र, ‘मराठा मंदिर’चा पारशी मालक द्यायला तयार नव्हते. कारण, त्याचवेळी ‘हाथी मेरे साथी’ व ‘बॉबी’ हे दोन हिंदी सिनेमे प्रदर्शित होणार होते. असे असले तरी दादा कोंडके यांनी ‘मराठा मंदिर’चा मालक फिरदोस तारापोरवा यांच्याशी चार महिनेआधी सकाळच्या शोसाठी करार केला होता.

Dada Kondke Birthday News
Richest Actor : अनुराग कश्यपने सांगितला अक्षय कुमारचा क्रमांक; म्हणाला...

मात्र, दोन महिनेआधी करार केल्यानंतरही फिरदोस तारापोरवा यांनी दादा कोंडके यांना ‘मराठा मंदिर’ देण्‍यास नकार दिला होता. यानंतर दादा कोंडके यांच्‍या चित्रपटाला मराठा मंदिर द्यावे म्‍हणून ग्रामीण भागातूनही मागणी वाढू लागली. दादा कोंडके यांनी विनंती केल्यानंतरही तारापोरवा ऐकून घ्यायला तयार नव्हते. उलट तारापोरवा यांनी गुंड बोलावून दादांना बाहेर काढले होते.

यानंतर दादा कोंडके हे आपले मित्र बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गेले. दादा कोंडके यांनी आपल्यासोबत घडलेला पूर्ण प्रसंग बाळासाहेबांना सांगितला. यानंतर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) चांगलेच चिडले. मराठी चित्रपटांना ‘मराठा मंदिर’मध्ये स्थान मिळत नसल्याचे पाहून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना ‘मराठा मंदिर’वर राडा करण्‍याचे आदेश दिले होते, हे विशेष...

भारतमातामध्येच लागायचे मराठी चित्रपट

त्याकाळी मुंबईमध्‍ये मराठी चित्रपट फक्त परळच्या ‘भारतमाता’ या सिनेमागृहात लागत असे. कारण, इतर चित्रपटगृहांचे मालक मराठी चित्रपट लावायला नकार देत होते. दादा कोंडके यांचा ‘सोंगाड्या’ व ‘एकटा जीव...’ भारतमाता या सिनेमागृहातच लागले. परंतु, या चित्रपटांनी चांगली कमाई केली नाही. त्याचे कारण म्हणजे चित्रपटगृह लहान आणि तिकीट दीड ते अडीच रुपये होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.