Gautami Patil : गौतमी पाटील लवकरच झळकणार वेब सीरिजमध्ये; म्हणाली, तुम्ही पाहालच…

dancer gautami patil soon appear web series movie and songs details rak94
dancer gautami patil soon appear web series movie and songs details rak94Esakal
Updated on

तरुणाईला तिच्या डान्समुळे भुरळ पाडणारी डान्सर गौतमी पाटील आता वेब सीरिजमध्ये पदार्पण करणार असल्याचे समोर आले आहे. गौतमीने माध्यमांशी बोलताना याबद्दलची माहिती दिली आहे.

अगदी काही दिवसांपासून गौतमी पाटील हे नाव तिच्या नृत्यामुळे चांगलेच प्रसिद्ध झाले आहे. दरम्यान नृत्य करताना तिच्या हावभावांवरुन तिच्यावर टिका देखील करण्यात आली होती. त्यानंतर गौतमीने माफी मागत भविष्यात असा प्रकार पुन्हा होणार नसल्याचे तिने स्पष्ट केलं.

गौतमीनं दिली माहिती..

आता गौतमी वेब सीरीजमध्ये झळकणार असल्याचे समोर आले आहे. दोन-तीन गाणी आणि एक चित्रपट तसेच वेब सीरिज वगैरे चालू आहेत अशी माहिती गौतमी पाटील हिने दिली आहे. या वेब सीरीज आणि चित्रपट कुठले आहेत, तसेच त्यांच्या नावांबद्दल किंवा त्यांच्या विषयाबद्दल अद्याप गौतमीने कुठलाही खुलासा केलेला नाहीये. ते आत्ताच सांगता येणार नाही, तुम्ही पाहालच असे तिने सांगितेल.

dancer gautami patil soon appear web series movie and songs details rak94
G20 in Pune Viral Memes : तर मग झेड ब्रीजचं सुशोभिकरण का नाही? जी-२० वरुन पुणेकरांचे टोमणे

दरम्यान सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील ही चांगलीच व्हायरल झाली आहे. काही दिवसांपूर्वा सांगली जिल्ह्यातील बेडग गावामध्ये झालेल्या तिच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची प्रचंडी गर्दी लोटली होती. या गर्दीमुळे जवळच असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं होते. त्यानंतर ती चांगलीच चर्चेत आली.

dancer gautami patil soon appear web series movie and songs details rak94
Nokia T21 Tablet Launched : खिशाला परवडणाऱ्या किंमतीत लाँच झाला नोकियाचा टॅबलेट; काय आहे खास?

दरम्यान सोशल मीडियावर धुमाकूळ घालत संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या गौतमीला अनेक कार्यक्रमात डान्स करण्यासाठी बोलवलं जातं. या कार्यक्रमांसाठी तिला मानधन देखील दिलं जातं. आता लवकरत ती मोठ्या पडद्यावर देखील झळकणार आहे. तीने तिचा घुंगरू नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी गौतमीला चित्रपटाची ऑफर देण्यात आली आहे. ‘घुंगरु’ असे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.