Dasara Movie: टॉलिवूड पुन्हा बॉलिवूडला नडलं! साऊथच्या 'दसरा'मुळे अजयचा 'भोला' चिंता वाढली

Dasara Box Office Collection Day 1
Dasara Box Office Collection Day 1Esakal
Updated on

राम नवमीच्या दिवशी बॉक्स ऑफिसवर दोन अ‍ॅक्शन चित्रपटाची मेजवाणी प्रेक्षकांना मिळाली. यात एकीकडे अभिनेता अजय देवगणचा भोला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

तर दुसरीकडे साऊथचा दसरा हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. दोन्ही चित्रपटात सुपरस्टार आणि दमादार अभिनयाला अ‍ॅक्शनची जोड होती. त्यामुळे चाहते या चित्रपटाची प्रतिक्षा करत होते.

Dasara Box Office Collection Day 1
Mrunal Thakur: मृणाल होतेय डिप्रेशनची बळी? सांगितली रडणाऱ्या फोटोमागची कहाणी..

तेलुगू सुपरस्टार नानीचे मक्की आणि जर्सी सारखे सुपरहिट चित्रपट अनेक हिंदी प्रेक्षकांनी पाहिले आहेत.

आता त्यांचा दसरा हा चित्रपट हिंदीसह अनेक भाषांमध्ये पॅन इंडिया प्रदर्शित झाला. 'दसरा' या तेलगू चित्रपटात टॉलिवूड स्टार नानी मुख्य भूमिकेत आहे. त्याचे चाहते अनेक दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत आहेत.

आता प्रदर्शित झाल्यानंतर दसरा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने भोलापेक्षाही जास्त कमाई केली आहे. ज्याची व्यापार विश्लेषकांनाही अपेक्षा नव्हती.

Dasara Box Office Collection Day 1
Prakash Raj Tweet: व्हायरल व्हिडिओप्रकरणी प्रकाश राज यांनी आमदाराची लाजच काढली! ट्विट व्हायरल...

सुरुवातीच्या अंदाजानुसार दसरा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जवळपास 17 कोटींचा व्यवसाय केला आहे.

नानीचा चित्रपट तेलुगु, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटाने तेलगू भाषेत सर्वाधिक कमाई केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दसरा चित्रपटाचे जास्तीत जास्त शो आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यांमध्ये सुरू आहेत.

येथील अनेक चित्रपटगृहांमध्ये पहाटे ५ वाजल्यापासूनच पहिला शो सुरू झाले आहेत.

दसरा चित्रपटात नानीसोबत अभिनेत्री कीर्ती सुरेश आणि धिकक्षित शेट्टी, समुथिराकनी आणि शाइन टॉम चाको हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

दसरा या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीकांत उडेला यांनी केले आहे. नानीने याआधी अनेक चित्रपट केले आहेत, ज्याद्वारे तिने तेलुगू चित्रपटसृष्टीत जबरदस्त फॅन फॉलोइंग मिळवले आहे.

Dasara Box Office Collection Day 1
Vijay Vikram Singh : 'बिग बॉस' साठी आवाज दिला आयुष्यच बदलून गेलं! 7 वर्ष होता डिप्रेशनमध्ये

2008 मध्ये प्रदर्शित झालेला अष्ट चम्मा हा तिचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर तो वे राइड, भीमिली कबड्डी जाट्टू, आला मोड़ालेंदी यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसला. 2022 मध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा शेवटचा चित्रपट अडाडे सुंदरा! हा होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.