Ajit Pawar: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं ‘आदर्श शिंदे’च्या ‘आला बैलगाडा’ गाण्याचं कौतुक, म्हणाले...

'आला बैलगाडा' हे मराठी गाणं सध्या चांगलंच गाजतंय
dcm ajit pawar praised ala bailgada marathi song by adarsh shinde
dcm ajit pawar praised ala bailgada marathi song by adarsh shinde SAKAL
Updated on

मराठी मनोरंजन विश्वात विविध विषयांवरची नवनवीन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. अशातच बैलगाडा शर्यत हे नवीन गाणं लोकांच्या भेटीला आलंय. आदर्श शिंदेंच्या आवाजातलं हे गाणं लोकांच्या पसंतीस उतरलंय. आता या गाण्याचं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कौतुक केलंय.

dcm ajit pawar praised ala bailgada marathi song by adarsh shinde
Shreyas Talpade: "मी त्याला रात्री भेटायला गेलो आणि..." श्रेयसच्या प्रकृतीबद्दल 'तुंबाड' फेम अभिनेत्याने दिले अपडेट

‘बैलगाडा शर्यत’ ही महाराष्ट्रातील ४०० वर्षांची परंपरा आहे. शेतकरी आणि बैलाचं सुंदर नातं दर्शवणारं बिग हिट मीडिया प्रस्तुत आणि प्रशांत नाकती म्युझिकल ‘आला बैलगाडा’ गाण सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार गाण्याविषयी म्हणाले, “अतिशय उत्तम गाणं झालं आहे. संगीतकार प्रशांत नाकती यांच्या सह विशाल फाले, वैष्णवी पाटिल, निक शिंदे आणि रितेश कांबळे या नवख्या कलाकारांनी अतिशय सुंदर काम केले आहे. गाण्याचे निर्माते ऋतिक अनिल मनी आणि अनुष्का अविनाश सोलवट यांनी गाणं केल्याबद्दल त्यांचे खूप कौतुक. यापुढील गाणी वेगवेगळ्या प्रकारची नव्या पिढीला भावतील आवडतील अशी करावी. या गाण्याच्या निर्मिती केलेल्या बिग हीट मीडियाच्या सर्व टीमला माझ्याकडून शुभेच्या.”

‘आला बैलगाडा’ हे गाणं सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे आणि ट्रेंडिंग गायिका सोनाली सोनावणे यांनी गायल आहे. तर प्रशांत नाकती आणि संकेत गुरव यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. या गाण्यात वैष्णवी पाटील, विशाल फाले, निक शिंदे आणि रितेश कांबळे या कलाकारांनी दमदार अभिनय केला आहे. ‘हृतिक अनिल मनी’ आणि ‘अनुष्का अविनाश सोलवट’ यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.