Siddhant Kapoor: पार्टीत लपवलेले गांजा,MDMA?; DCP चा मोठा खुलासा

शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांत कपूर याला बंगळूरात एका रेव्ह पार्टीत पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात अटक करण्यात आली आहे.
DCp Guled speaks about siddhant kapoor drugs case
DCp Guled speaks about siddhant kapoor drugs caseGoogle
Updated on

शक्ती कपूरचा(Shakti Kapoor) मुलगा सिद्धांत कपूर(Siddhant Kapoor) याला बंगळूरात एका रेव्ह पार्टीत पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात अटक करण्यात आली. त्यानं ड्रग्ज सेवन (Drugs Case) केल्याचं स्पष्ट झालं आहे असं पोलिसांकडून सांगण्यात आलं असलं तरी सिद्धांत तिथे कामासाठी गेला होता,तो पार्टीत डिजे म्हणून गेला होता,तो असं करणं शक्यच नाही असं शक्ती कपूर यांचे म्हणणे आहे. आता या प्रकरणात नेमका पोलिस तपास कसा सुरु आहे? याविषयी डिसीपी डॉ. भीमाशंकर गुलेड यांनी खुलासा केला आहे.

DCp Guled speaks about siddhant kapoor drugs case
Siddhanth Kapoor Drugs Case: रेव्ह पार्टीतील 'तो' Video viral, मोठा खुलासा

सिद्धांतसोबत आणखी पाच जणांनी ड्रग्ज सेवन केल्याचं म्हणणं पोलिसांचे आहे. यासंदर्भात ANI ला माहिती देताना डीसीपी B.S.Guled यांनी माहिती दिली आहे की,''पार्टीवर छापा टाकल्यावर एकूण ३५ जणांना ताब्यात घेण्यात आलं. त्यात ड्रग्ज संदर्भात महत्त्वाची टेस्ट केल्यानंतर सहा जणांनी ते सेवन केल्याचं आढळून आलं. पण असं असलं तरी पार्टीत कुठल्याही प्रकारचे अमली पदार्थ सापडले नाहीत. पण आम्ही छापा टाकल्याचे कळताच एके ठिकाणी कुणीतरी MDMA आणि गांजाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केलेला दिसून आला. हॉटेलमधील सीसीटीव्ही फूटेजमधून हे कोणी करण्याचा प्रयत्न केला यांसदर्भात आम्ही लवकरच छडा लावू''.

सिद्धांत कपूरला ड्रग्ज केस प्रकरणात अटक झाल्यानंतर आता हळूहळू बॉलीवूड मधून प्रतिक्रिया समोर येत आहेत. सिद्धांत ड्रग्ज Controversy संदर्भात शत्रुघ्न सिन्हांचा मुलगा लव सिन्हा यानं तपास अधिकाऱ्यांना सुनावलं आहे. तो म्हणाला आहे,''ड्रग्ज सेवन करणाऱ्यांपेक्षा त्याची निर्मिती करणारे आणि त्याचे डिलर्स यांना पकडून नेस्तनाबूत करा. तरच या विषयाचा समूळ नाश होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.