Deepali Sayed: दिपाली यांना मिळाली 'ही' पदवी; म्हणाल्या, मी समाजाच्या भल्यासाठी...

अभिनेत्री दीपाली सय्यदने फोटो शेयर करत दिली आनंदाची बातमी.
Deepali sayed receive an Honorary Doctorate in Public Administration
Deepali sayed receive an Honorary Doctorate in Public Administration sakal
Updated on

Deepali sayed: अभिनेत्री आणि राजकारणी अशी दुहेरी ओळख असणाऱ्या दीपाली सय्यद सर्वांना चांगल्याच परिचित आहेत. गेली काही वर्ष अभिनयापेक्षा राजकरणाकडे त्या अधिक सक्रिय झाल्याने सतत त्या चर्चेत असतात. कधी वादग्रस्त विधान तर कधी पक्षाच्या वतीने बोलण्यासाठी त्या सोशलमीडियावर बऱ्याच सक्रिय असतात.

आज मात्र त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आणि सर्वांच्याच नजरा उंचावल्या. अभिनेत्री आणि राजकारणी अशी ख्याती असणाऱ्या दीपाली यांनी आता तिसरी पदवी मिळवली आहे. नुकतच त्यांनी ''पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन'' या विषयात डॉक्टरेट मिळवली आहे.

(Deepali sayed receive an Honorary Doctorate in Public Administration)

Deepali sayed receive an Honorary Doctorate in Public Administration
Prakash Raj Birthday: १२ वर्ष लहान मुलीशी लग्न आणि ५० व्या वर्षी पाळणा.. प्रकाश राज यांचा नाद नाय!

याच संदर्भात दीपाली सय्यद यांनी एक पोस्ट लिहिली आहे. पदवी प्रसाद सोहळ्यातील काही खास फोटो त्यांनी शेयर केले आहेत. सोबतच एक कॅप्शन दिले आहे. त्यामध्ये दीपाली म्हणतात की, 'तुम्हा सर्वांना कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की, नुकतीच मला लोक प्रशासन म्हणजेच पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन या विषयात डॉक्टरेट पदवी मिळाली. अत्यंत सन्मानपूर्वक आणि विनम्रतेने ही पदवी मी स्वीकार केली आहे.'

'आता समाजाच्या भल्यासाठी मी अथक परिश्रम करण्यास तयार आहे आणि तुमच्या पाठिंब्याने आणि आशीर्वादाने असेच काम करत राहीन.' अशा शब्दात दीपाली यांनी पदवी स्वीकारल्या नंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मराठी मनोरंजन विश्वातील एक नामवंत अभिनेत्री म्हणून दीपाली सय्यद यांनी काम केले आहे. मुंबईचा डबेवाला, आता होऊन जाऊदे, चष्मेबहाद्दर्, सासर माझं दैवत, दुर्गा म्हणतात मला अशा कित्येक चित्रपटात दीपाली प्रमुख भूमिकेत होत्या. त्या उत्तम डान्सर आहेत.

पण अभिनयासोबतच त्यांनी सामाजिक कामात विशेष रस दाखवला आणि हळू हळू राजकारणात पदार्पण केले. सुरवातीला त्या अनेक वर्ष शिवसेनेसोबत होत्या. पण शिवसेनेते फुट पडताच त्यांना ठाकरे गट आणि शिंदे गट यापैकी त्यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.