Deepika Padukone: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते. काही दिवसांपुर्वी दीपिका कॉफी विथ करणमध्ये रणवीर सोबत दिसली होती.
या शोमध्ये तिने केलेल्या वक्तव्यामुळे नेटकऱ्यांनी तिला खुपच ट्रोल केले होते. मात्र दीपिकावर ट्रोलिंगचा काहीच परिणाम होत नाही.
ती तिच्या कामात व्यस्त असते. आता दीपिका नुकतीच 3 डिसेंबर रोजी लॉस एंजेलिसमध्ये आयोजित अकादमी म्युझियम गाला कार्यक्रमात सहभागी झाली होती.
म्युझियम गाला हे ऑस्करनंतर जगातील दुसरे सर्वात मोठे व्यासपीठ आहे. या वर्षाच्या सुरुवातीला दीपिका ऑस्कर सोहळ्यात दिसली होती.
तर आता वर्षाच्या अखेरीस तिने अकादमी म्युझियम गालामध्ये उपस्थिती लावली. या कार्यक्रमात तिच्यासोबत सेलेना गोमेझ, दुआ लिपा आणि इतर हॉलीवूड स्टार देखील सहभागी झाले होते.
या कार्यक्रमात दीपिकाने जांभळ्या रंगाचा वेलवेट गाऊन परिधान केला होता. ज्यात ती खुपच सुंदर दिसत होती. तिने रेड कार्पेटवर फोटोग्राफर्ससाठी पोज दिली.
तिच्यासोबत नताली पोर्टमन, लुपिता न्योंग'ओ, के ह्यू क्वान आणि मेरील स्ट्रीप सारख्या हॉलिवूडचे स्टारही दिसले.
या कार्यक्रमात आमंत्रित झालेली दीपिका ही पहिली भारतीय अभिनेत्री बनली आहे. दीपिका पदुकोणने पुन्हा जागतिक कामगिरी केली आहे.
म्युझियमच्या प्रदर्शनासाठी आणि सार्वजनिक कार्यक्रमासाठी निधी उभा करणे हे या वार्षिक अकादमी म्युझियम गालाचे ध्येय असते.
यासोबत निधी उभारण्याव्यतिरिक्त, या कार्यक्रमात मेरिल स्ट्रीप, मायकेल बी. जॉर्डन, ओप्रा विन्फ्रे आणि सोफिया कोपोला यांसारख्या सेलिब्रिटींना त्यांच्या सिनेमातील योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटात दिसली होती, आता ,ती लवकरच हृतिकसोबत फायटरमध्ये दिसणार आहे. यासोबतच ती नाग अश्विनच्या 'कल्की 2898 एडी'मध्ये दिसणार आहे.
या चित्रपटात तिच्यासोबत प्रभास, अमिताभ बच्चन आणि कमल हासन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. यासोबतच ती रोहित शेट्टीच्या सिंघम अगेन चित्रपटात लेडी सुपर कॉपच्या भूमिकेत दिसणार आहे.
आता दीपिकाने पुन्हा एकदा इतक्या मोठ्या जागतिक व्यासपीठावर देशाचे प्रतिनिधित्व करून सर्वांना गर्वित केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.