Deepika Bikini Row: 'भगव्या रंगाचा लंगोट चालतो तर...' पप्पी दे पारुवाली स्मिताची जळजळीत प्रतिक्रिया

किंग खान शाहरुखच्या पठाणच्या चित्रपटातील बेशरम रंग नावाचे गाणे व्हायरल झाले आहे.
Deepika Bikini Row
Deepika Bikini Rowesakal
Updated on

Deepika Padukone safferon color bikini Smita Gondkar: किंग खान शाहरुखच्या पठाणच्या चित्रपटातील बेशरम रंग नावाचे गाणे व्हायरल झाले आहे. त्यावरुन दीपिकाला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले आहे. हिंदूत्ववादी काही संघटनांनी तर शाहरुखला धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. आता प्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्मिता गोंदकरची प्रतिक्रिया समोर आली आहे.

आपल्या बोल्डनेस आणि हॉटनेससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणून स्मिता गोंदकरच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. सोशल मीडियावर तिच्या फोटोंना चाहत्यांच्या मिळणाऱ्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. आता तिनं दीपिकाच्या भगव्या रंगावरील बिकीनीवरुन जो वाद सुरु आहे त्यावर परखड शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

Also Read- Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकीनीवरुन सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वाद पेटला आहे. यापूर्वी बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी, तसेच मराठी मनोरंजन विश्वातील कलाकांनी जो काही ट्रेंड सुरु झाला आहे त्यावरुन निषेध व्यक्त केला आहे. लोकांना वेगळ्या प्रकारे विचार करण्यास प्रवृत्त करण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे आपण काय करावे याचा निर्णय आता लोकांनीच घेण्याची गरज आहे असे कलाकारांनी म्हटले आहे.

Deepika Bikini Row
Deepika Padukone : दीपिकाच्या 'त्या' बिकिनीची किंमत माहितंय का?

स्मितानं साम टीव्हीला दिलेल्या एका प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे की, भगव्या रंगावरुन जो काही वाद सुरु आहे तो काही संपण्याचे नाव घेत नाही. मला नाही वाटत दीपिकाचे काही चुकले म्हणून. कुस्तीतल्या आखाड्यामध्ये जो लंगोट असतो तो भगव्या रंगाचा असतो मग त्याबाबत आपण काय विचार करतो. हे फक्त काय महिलांपूरते मर्यादित आहे का, असा प्रश्न स्मितानं दीपिकाला बिकीनीवरुन ट्रोल करणाऱ्यांना विचारला आहे.

Deepika Bikini Row
Viral Photo : 'माझं अनुकरण करू नका'; भाजप मंत्र्याने सुचनांसहित पोस्ट केला फोटो

दीपिकानं दुसरा काही विचार करुन ती बिकीनी परिधान केलेली नाही. प्रत्येक अभिनेत्री स्क्रीनवर छानच दिसायचे असते. मलाही भीती वाटू लागली आहे. कोणती कपडे घालायचे याचा विचार करुन. मला खरं तर हे काय चालले आहे हे जाणून घ्यायचे आहे. असे स्मितानं म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.