'83'च्या रिलीजपूर्वी दीपिकाने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

दीपिका म्हणते, 'हा चित्रपट नाही, भावना आहे'
Deepika Padukone
Deepika Padukone
Updated on

तिचे चित्रपट रिलीज (release) होण्यापूर्वी, अभिनेत्री दीपिका पदुकोण (Actress Deepika Padukone) मुंबईच्या (Mumbai) सिद्धिविनायक मंदिरात (Sidhivinayak Temple)आशीर्वाद घेण्यासाठी जाते. यावेळी '83'च्या रिलीजपूर्वी ती मंदिराबाहेर दिसली. हा चित्रपट 24 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.

गुरुवारी संध्याकाळी ही अभिनेत्री गणेशाचा आशीर्वाद घेताना दिसली. लाल सलवार कमीज (salwar-kameez) परिधान करून तिला तिचा बॉडीगार्ड (Bodyguard) मंदिरात घेऊन जाताना दिसला.

कबीर खान (Kabir Khan) दिग्दर्शित या चित्रपटात दीपिका रोमी भाटियाची (Romi Bhatia) भूमिका साकारताना दिसणार आहे तर रणवीर सिंग (Ranveer Singh) हा कपिल देव (Kapil Dev) यांची भूमिका साकारत आहे. अभिनयासोबतच दीपिकाने या प्रोजेक्टची निर्मितीही (Producer) केली आहे.

दरम्यान, दीपिकाने तिची इन्स्टाग्राम स्टोरीवर(Instagram story) एक व्हिडिओ टाकला. ती '83' बद्दल बोलताना आणि रिलीज होण्यापूर्वी तिचा उत्साह व्यक्त करताना दिसत आहे. तिला असे म्हणताना ऐकू येते, " '83' हा चित्रपट माझ्यासाठी अविश्वसनीय आहे असे मी म्हणेन. माझ्यासाठी '83' हा चित्रपट नाही, ती एक भावना आहे. तो एक अनुभव आहे. मला वाटतं की तुम्हाला काय वाटते ते तुम्ही कधी कधी परिभाषित (express) करू शकत नाही. चित्रपट पाहून तुम्ही सिनेमागृहातून (theartre) बाहेर येता त्यावेळी प्रेक्षक आनंदाने हसतात, ते रडतात, ते नि:शब्द असतात... मला वाटत नाही की त्यांना काय वाटते किंवा हा चित्रपट तुम्हाला कसा वाटतो हे सांगू शकाल.

‘८३’ व्यतिरिक्त, दीपिका ‘महाभारत’ (Mahabharat), नाग अश्विनचा (Naga Ashwin) ‘प्रोजेक्ट के’ (Project K), ‘द इंटर्न रिमेक’ (The intern remake), ‘पठाण’ (Pathan), ‘फाइटर’ (Fighter), STX हॉलीवूड (Hollywood) चित्रपट आणि ‘गेहरायान’ (Gehraiyaan) मध्ये दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()