इथं परिस्थिती काय आहे? वादळात उखडलेल्या झाडाजवळ अभिनेत्रीचं फोटोशूट

'दिया और बाती हम' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली दीपिका नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.
deepika singh
deepika singh esakal
Updated on

देशात तौक्ते या चक्रिवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोमवारी तौक्ते वादळ मुंबईमध्ये दाखल झाले. मुंबईमधील किनारपट्टीलगतच्या भागात या चक्रिवादळाचा तडाखा बसला. अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. एकीकडे चक्रिवादळामुळे इतकं नुकसान होत असताना दुसरीकडे एका टीव्ही अभिनेत्रीने वादळात उखडलेल्या झाडाजवळ चक्क फोटोशूट केलं. ही अभिनेत्री दीपिका सिंह Deepika Singh. इतकंच नव्हे तर पावसात भिजत डान्स करतानाचा व्हिडीओसुद्धा तिने शेअर केला आहे. (deepika singh criticised for dancing in rain posing with uprooted trees)

'दिया और बाती हम' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका सिंह सध्या सोशल मीडियावर तिच्या फोटोशूट आणि डान्समुळे चर्चेत आहे. या व्हिडीओत ती रस्त्यावर पडलेल्या झाडांसमोर डान्स करतानाचा दिसतेय. दीपिकाने चक्रिवादळामुळे उखडलेल्या झाडासमोर फोटोशूटदेखील केले आहे. या डान्सच्या व्हिडीओला तिने कॅप्शन दिले, 'तुम्ही वादळाला शांत नाही करू शकतं, त्यामुळे प्रयत्न करणं थांबवा. त्याऐवजी तुम्ही स्वत:ला शांत ठेवा. निसर्गावर प्रेम करा आणि त्याचा मूड सहन करायला शिका. एक दिवस हे वादळ नक्की जाईल' . या व्हिडीओ आणि फोटोमुळे दीपिकाला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. 'इथे वादळामुळे लोकांचे हाल होतायत आणि तू डान्स, फोटोशूट करत मजा करतेय. हे खूप लाजिरवाणं आहे,' असं एकाने लिहिलं. तर 'आपत्तीत संधी कशी शोधायचं हे तुझ्याकडून शिकायला हवं', असं दुसऱ्याने लिहिलं.

deepika singh
सोनाली कुलकर्णीचा पती आहे तरी कोण?

दीपिका 'दीया और बाती हम’ या प्रसिद्ध हिंदी मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेमधील दीपिकाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.