सुशांतच्या आयुष्यावरील चित्रपटाला स्थगिती नाही, कोर्टाने फेटाळली याचिका

सुशांतच्या वडिलांनी दाखल केली होती याचिका
sushant singh rajput
sushant singh rajput
Updated on

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या Sushant Singh Rajput आयुष्यावर आधारित चित्रपटाविरोधातील त्याच्या वडिलांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने Delhi High Court फेटाळून लावली. सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी त्यांच्या मुलाचं नाव वापरून किंवा त्याच्या आयुष्याशी संबंधित चित्रपट करण्यास विरोध असल्याची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. 'न्याय : द जस्टिस' या नावाचा चित्रपट सुशांतच्या आयुष्यावर आधारित असल्याचं समजतंय. याच चित्रपटाला सुशांतच्या वडिलांचा विरोध आहे. येत्या ११ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (Delhi High Court Refuses To Stay Film On Sushant Rajputs Death)

याचिकेत काय होती मागणी?

सुशांतच्या आयुष्यावर आधारित कोणताही चित्रपट बनू नये आणि चित्रपटात त्याच्या नावाशी किंवा त्याच्याशी मिळत्याजुळत्या पात्रांचा समावेश असू नये अशी त्याच्या वडिलांची मागणी होती. या याचिकेत त्यांनी 'न्याय : द जस्टिस', 'सुसाइड ऑर मर्डर : अ स्टार वॉज लास्ट', 'शशांक' यांसारख्या चित्रपटांच्या नावांचा उल्लेख केला होता.

sushant singh rajput
खासदार नुसरत जहांच्या रिलेशनशिपची चर्चा; यश दासगुप्ता आहे तरी कोण?

१४ जून २०२० रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह त्याच्या मुंबईतील राहत्या घरी आढळला होता. त्याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत आहे. तर सुशांतच्या मृत्यू प्रकरणातील ड्रग्जच्या अँगलचा तपास एनसीबी करत आहे. एनसीबीने याप्रकरणी अभिनेत्री आणि सुशांतची कथित एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला अटक केली होती. सुशांतच्या वडिलांनी रियावर सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता.

sushant singh rajput
'देवमाणूस' मालिकेत होणार 'या' अभिनेत्रीची एंट्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.