Vivek Agnihotri On Delhi Pollution : 'मेलेली लोकं तर काही बोलणार नाहीत, पण...' विवेक अग्निहोत्रींची सणसणीत प्रतिक्रिया!

सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय प्रदुषण नियंत्रण बोर्ड यांनी देखील प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत.
Delhi Pollution Vivek Agnihotri Reaction
Delhi Pollution Vivek Agnihotri ReactionEsakal
Updated on

Delhi Pollution Vivek Agnihotri Reaction :

देशाची राजधानी दिल्ली ही आता सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. त्याचे कारण दिल्लीतील वाढते प्रदुषण. दिल्लीत मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढताना दिसत आहे. दिल्ली आणि दिल्लीच्या आसपासच्या परिसरातील हवा ही कमालीची प्रदूषित झाली आहे. त्या प्रदुषणानं धोक्याची पातळी केव्हाच ओलांडली आहे.

जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये दिल्लीचे नाव आल्यानंतर वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाल्याचे दिसून आले आहे. अशावेळी न्यायालयानं देखील या घटनेची नोंद घेत प्रशासनाला फटकारले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या दिल्लीत वाढत्या प्रदूषणामुळे शाळा देखील ऑनलाईन सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीच्या या परिस्थितीवर अनेक सेलिब्रेटींनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

सर्वोच्च न्यायालय, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड यांनी देखील प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत. दिल्लीच्या या प्रदूषणावर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सतीश चंद्र शर्मा यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. त्यावर प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ती चर्चेत आली आहे.

अग्निहोत्री यांनी न्यायाधीश शर्मा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली असून त्याकडे नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. अग्निहोत्री यांनी शर्मा यांची एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये म्हटले होते की, आज सकाळी वॉकला जाता आले नाही. डोळ्यांमध्ये खूपच जळजळ सुरु झाली होती. कारमधून येत असताना समोरचे काहीच स्पष्टपणे दिसत नव्हते.

Delhi Pollution Vivek Agnihotri Reaction
Rashmika Viral Video : रश्मिकाचा 'तो' व्हिडिओ, अमिताभ बच्चन यांचा संताप! 'कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी', नेमकं घडलं काय?

त्यावर अग्निहोत्री यांनी म्हटले आहे की, शेवटी कोणतरी बोललं. विरोध करा, असहमती दर्शवा. पण या प्रश्नांवर कुणी बोललं पाहिजे. पर्यावरणाच्या बाजूनं कुणी बोलायला हवं. सरकार दबाव टाका किंवा नका टाकू यापेक्षा त्या प्रश्नावर व्यक्त होणं जास्त महत्वाचं आहे. कारण मेलेली लोकं काहीही बोलू शकत नाहीत. दिल्लीमध्ये राष्ट्रपतींपासून एमसीडी, दूतावास अशी वेगवेगळ्या स्तरातील मान्यवर आहेत. त्यांनी या प्रश्नावर काही विचार केला आहे का, असा प्रश्न अग्निहोत्री यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.