Ankita Landepatil: "खऱ्या आयुष्यात सुद्धा मी एक डॉक्टर आहे", अंकिताने सांगितलं 'डिलिव्हरी बॉय’ का आहे स्पेशल ?

Ankita Landepatil: ‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटात प्रथमेश परब (Prathamesh Parab), अंकिता लांडे-पाटील (Ankita Landepatil) आणि पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap) आदी कलाकार काम करत आहेत.
Ankita Landepatil delivery boy
Ankita Landepatil delivery boyesakal
Updated on

Ankita Landepatil: दिग्दर्शक मोहसीन खान यांचा ‘डिलिव्हरी बॉय’ (Delivery Boy) हा चित्रपट आजपासून (9 फेब्रुवारी) सगळीकडे प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात प्रथमेश परब (Prathamesh Parab), अंकिता लांडे-पाटील (Ankita Landepatil) आणि पृथ्वीक प्रताप (Prithvik Pratap) आदी कलाकार काम करत आहेत. लुसिया एंटरटेन्मेंट प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे डेव्हिड नादर निर्माते आहेत. या चित्रपटात प्रथमेश परबबरोबरच अंकिता लांडे-पाटीलही मुख्य भूमिका साकारत आहे. यानिमित्त सायली ससाणे यांना अंकितानं या चित्रपटाबद्दल सांगितलं.

‘डिलिव्हरी बॉय’ या चित्रपटात तू काम करत आहेस.या चित्रपटाबद्दल तू काय सांगशील? या प्रश्नाचं उत्तर देताना अंकिता लांडे-पाटील म्हणाली,"खूप महत्त्वाचा विषय आम्ही मांडतोय. या चित्रपटाचा मी एक भाग आहे, याचा मला खूप आनंद आहे. काही चित्रपट बघताना आपल्याला असे वाटते की, ही भूमिका मी करायला हवी होती.अगदी तसेच मला या चित्रपटातील भूमिका करताना वाटले. त्यामुळे मला खूप आनंद झाला की या चित्रपटाचा मी एक भाग आहे. खऱ्या आयुष्यातसुद्धा मी एक डॉक्टर आहे. या चित्रपटामध्ये सुद्धा मी त्याच प्रकारची भूमिका साकारली आहे.

जेव्हा मी या चित्रपटाच्या ऑडिशनसाठी गेली होते, तेव्हा त्यांनासुद्धा असे वाटले की या मुलीलासुद्धा काही तरी दुसऱ्यांसाठी करायचे आहे आणि मला ती संधी मिळाली. जे मला खऱ्या आयुष्यात करता नाही आले ते मी भूमिकेमध्ये साकारते आहे. ही भूमिका करताना काही तरी नवीन अनुभवायला मिळाले, हे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे."

तू या चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकली तेव्हा तुझ्या भावना काय होत्या? असा प्रश्न देखील अंकिताला मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना अंकिता म्हणाली, "हा चित्रपट मला करायलाच हवा, अशी माझी भावना झाली. कोणताही चित्रपट निवडताना माझा एक नियम असतो की जी व्यक्तिरेखा आपण करतोय त्याचा किती सखोल अभ्यास आपण केला पाहिजे. ही स्क्रीप्ट जेव्हा मी वाचली तेव्हा ती मला खूप आवडली. हा किती चांगला विषय आहे आणि जो आपण लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत."

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सर्वात कठीण सीन कोणता होता? असा प्रश्न विचारल्यानंतर अंकितानं उत्तर दिलं, "अवघड असा कोणताही सीन नव्हता, पण आवडणारे प्रसंग खूप आहेत. ट्रेलरमध्ये माझ्या एन्ट्रीचा प्रसंग आहे, तो मला करताना खूप आवडला. तो सीन शूट करताना खूप मजा आली."

तू साकारलेल्या भूमिकेसाठी कोणती मेहनत घेतलीस? या प्रश्नाचं उत्तर देताना अंकिता म्हणाली,"जरी माझे प्रोफेशन डॉक्टरचे असले तरी सरोगसी प्रकार काय असतो हे मला चित्रपट करताना जाणवले व समजले. तसेच खूप काही नवीन शिकायला मिळले."

पुढे अंकितानं चित्रपटाच्या विषयाबद्दल सांगितलं, "सरोगसी हा खूप महत्त्वाचा विषय आहे.ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, पण कसे असते की जितकी आपल्याला माहिती असते तितकी गावाकडच्या लोकांना माहिती नसते. हा विषय प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे खूप गरजेचे आहे. या विषयाबद्दल समाजाने आता खूप बोलायला हवे तरच आपण पुढे खूप प्रगती करू शकतो.ज्या महिलांना मूल होत नाही त्यांच्यासाठी हे खूप सोपे होऊन जाईल."

"मी केलेल्या दोन्ही भूमिकांनी मला खूप काही शिकवले आणि प्रोत्साहन दिले. आता मी जी भूमिका करत आहे त्यातसुद्धा जसजशी स्टोरी पुढे जाते, तसतसे तिला खूप अडचणी येत असतात. तरी ती खचून जात नाही. त्यामुळे दोन्ही भूमिकांनी मला आयुष्यात कधी थांबले नाही पाहिजे. पुढे जायचे असते हे शिकवले आहे.", असं अंकिता तिच्या भूमिकेबद्दल म्हणाली.

तू अजून काही नवीन प्रोजेक्ट्स घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना अंकिता म्हणाली,"माझ्या अजून दोन फिल्म येणार आहेत. त्यांचे चित्रीकरण सुरू आहे, पण अद्यापही ते कधी प्रदर्शित होणार आहेत हे समजले नाही. माझे इतकेच म्हणणे आहे, की जसे ‘गर्ल्स’ला प्रेम दिले, तसेच ‘डिलिव्हरी बॉयला’सुद्धा प्रेम द्या आणि तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांत जाऊन हा चित्रपट नक्की बघा."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.