Amruta Fadnavis New Song : 'देवाधी देवा...' महाशिवरात्रीच्या निमित्तानं अमृता फडणवीसांचे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला! शंकर महादेवनचीही साथ

महाशिवरात्रीच्या निमित्तानं अमृताजींच्या त्या गाण्याचे (Amruta Fadnavis Song) नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.
Amruta Fadnavis Latest News
Amruta Fadnavis Latest Newsesakal
Updated on

Amruta Fadnavis Song : आपल्या वेगळ्या धाटणीच्या आवाजासाठी लोकप्रिय असणाऱ्या अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्यानं आता नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे. महाशिवरात्रीच्या निमित्तानं देवाधी देवा हे गाणं चाहत्यांच्या कौतुकाचा विषय आहे. त्या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात प्रसिद्ध गायक संगीतकार शंकर महादेवन यांच्या आवाजानं कमाल केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून देवाधी देव महादेव गाण्याची चर्चा होती. आता ते गाणं सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याकडे नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. शिवसंभो, नीलकंठ तू अनादी....देवाधी देव महादेव...असे त्या गाण्याचे बोल असून शंकर महादेवन यांनी महादेवाची स्तुती त्या गाण्यातून केली आहे. युट्युबवर व्हायरल झालेले त्या गाण्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

शंकर महादेवन, अमृता फडणवीस या दोघांनी त्या गाण्यातून चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. यापूर्वी देखील अमृताजींच्या व्हायरल झालेल्या गाण्यांना चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. वेगवेगळ्या महोत्सवांमध्ये त्यांनी भाग घेत गाणी गात प्रेक्षकांची, नेटकऱ्यांची पसंती मिळवल्याचे दिसून आले आहे.

Amruta Fadnavis Latest News
Shaitan Review: आर.माधवन भाव खाऊन गेला, हिरोपेक्षा व्हिलन वरचढ ठरला, पण काही गोष्टी मात्र खटकल्या, कसा आहे शैतान? वाचा रिव्ह्यू

अमृताजींविषयी बोलायचे झाल्यास त्या सोशल मीडियावर लोकप्रिय असणाऱ्या सेलिब्रेटी आहे. केवळ गाणेच नाही तर त्या त्यांच्या परखड प्रतिक्रियेसाठी देखील ओळखल्या जातात. आपल्या रोखठोक बोलण्यामुळे त्या अनेकदा चर्चेत असल्याचे दिसून आले आहे. दुसरीकडे मनोरंजन क्षेत्रातही त्या सक्रिय असल्यानं विविध फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांची लोकप्रियता मिळवताना दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.