Devoleena On The Kerala Story: द केरळ स्टोरी पाहिल्यानंतर गोपी बहू म्हणते, 'माझाही नवरा मुस्लिम'

Devoleena Bhattacharjee On The Kerala Story
Devoleena Bhattacharjee On The Kerala StoryEsakal
Updated on

Devoleena Bhattacharjee On The Kerala Story: अदा शर्मा अभिनित आणि प्रसिद्ध दिग्दर्शक सुदिप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट मोठ्या वादाच्या भोवऱ्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. 'द केरळ स्टोरी' रिलीज होऊन आठवडा झाला आहेत.

लवकरच हा चित्रपट शंभर कोटींच्या क्लबमध्ये सामिल होईल अशी आशा निर्मात्यांना आहे. मात्र द केरळ स्टोरीवरुन देशात तुफान वादही झाले. काहींनी या चित्रपटाला प्रोत्साहन देत पाठिंबा दर्शविला तर अनेकांनी या चित्रपटला प्रोपगंडा म्हणत त्यावर टिका केली.

अनेक राजकारण्यांपासून तर कलाकारांपर्यंत बऱ्याच लोकांनी यावर मत माडलं आहे. आता याच मूद्यावर टिव्हीवरिल गोपी बहू म्हणजेच देवोलिना भट्टाचार्जी हिने प्रतिक्रिया दिली आहे.

द केरळ स्टोरी हा चित्रपट लव जिहाद आणि धर्मांतरण या अनेक गंभीर मुद्यावर भाष्य करणारा आहे.

देवोलिना भट्टाचार्जीने एका मुस्लिम पुरुषाशी लग्न केले आहे त्यामुळे ज्यावेळी तिने या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली तेव्हा सर्वांच लक्ष त्याकडे गेले.

Devoleena Bhattacharjee On The Kerala Story
Bhaurao Karhade Podcast: टीडीएमचं गणित बिघडलं की बिघडवलं? या प्रश्नावर भाऊचं कडक शब्दांत उत्तर..

त्याच झालं असं की, एका मुलीनं ट्विटरवर तिच्या मैत्रिणीची स्टोरी सांगितली. यात ती म्हणते की, माझी मैत्रीण निधीचा बॉयफ्रेंड मुस्लिम आहे. जेव्हा निधीने त्याला सहज विचारलं की ते दोघे एकत्र द केरळ स्टोरी चित्रपट पहायला जाणार आहेत का? तेव्हा तो खुप वाईटरित्या वागला. त्याने निधीला चित्रपट पाहण्यापासून रोखलं नाही तर तिला शिवीगाळही केली. त्याचवेळी त्यांनी निधीवर इस्लामोफोबिक असल्याचा आरोप केला. यानंतर मुलीने त्या मुस्लिम मुलाशी संबंध तोडले आणि जाऊन चित्रपट पाहिला.

Devoleena Bhattacharjee tweets about The Kerala Story
Devoleena Bhattacharjee tweets about The Kerala Story Esakal

आता हे ट्विट देबोलिनाने पाहिल्यानंतर तिने यावर तिची प्रतिक्रिया दिली. तिला हे मुळिच पटलं नाही. तिने लगेचच यावर तिची भूमिका मांडली.

ट्विटला उत्तर देतांनी ती म्हणाली की, हे नेहमीच घडले पाहिजे असं नाही. माझा पतीही मुस्लिम असून त्यांनी माझ्यासोबत चित्रपट पाहिला. यासोबतच त्यांने या चित्रपटाचं कौतुकही केले. ना तो नाराज झाला ना त्याने ते त्याच्या धर्माविरुद्ध घेतलं आणि मला असं वाटते की प्रत्येक भारतीयाने असेच असलं पाहिजे.

Devoleena Bhattacharjee On The Kerala Story
'TDM'च्या गोंधळानंतर 'मराठी प्रेक्षकां'बाबत दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचं मोठं विधान..

आता देबोलिनाचं हे ट्विट सोशल मिडियावर लगेचच व्हायरल झालं. तिच्या या ट्विटवर नेटकरींनीही प्रतिक्रिया दिल्या आहे. काहींना तिचं म्हणणं पटलं तर काहींनी तिच्यावर टिकाही केली.

देबोलिनावर टिका करण्याची ही पहिलिच वेळ नाही. तिने तिच्या पतीसोबत फोटो टाकल्यानंतर तिला बऱ्याच वेळा ट्रोल केले जाते कारण तिने एका मुस्लिम व्यक्तिशी लग्न केले आहे. मात्र देबोलिनाही वेळोवेळी ट्रोल करणाऱ्यांना सडतोड उत्तर देत असते.

Devoleena Bhattacharjee On The Kerala Story
Urvashi Rautela: ऋषु कुठयं तू वहिनींना धमकी दिलीय! IPL सामन्यात घडलं काय?

देवोलीनाबद्दल सांगायचं तर तिने 14 डिसेंबर 2022 रोजी जिम ट्रेनर शाहनवाज शेखसोबत लग्न केले. या लग्नाची खूप चर्चा झाली. ती टीव्ही जगतील एक प्रसिद्ध नाव आहे. ती सलमान खानच्या बिग बॉस शोमध्ये दिसली होती. याशिवाय ती 2012 ते 2017 या काळात साथ निभाना साथियामध्ये गोपी बहूच्या भूमिकेत दिसली आहे. त्यानंतर तिला गोपी बहु म्हणुनही ओळखलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.