Gulshan Kumar Birthday News: आज गुलशन कुमार यांची जयंती. गुलशन कुमार यांना म्युझिक इंडस्ट्रीचा बादशाह म्हणतात. गुलशन कुमार यांनी T SERIES च्या माध्यमातून स्वतःची म्यूझीक इंडस्ट्री निर्माण केली.
हिंदी मनोरंजन विश्वात अनेक धार्मिक गाणी निर्माण करण्यात गुलशन कुमार यांचा हातखंडा आहे. गुलशन कुमार वैष्णवदेवीचे मोठे भक्त होते. त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा वैष्णोदेवी मंदिरात एक खास गोष्ट केली जाते.
(Devotee of Vaishno Devi Gulshan Kumar's son continues 'this' work in the temple even after his father death)
ज्यूस विकणारा मुलगा झाला म्युझिक इंडस्ट्रीचा बादशाह
गुलशन कुमार यांचा जन्म दिल्लीच्या दर्यागंज भागात एका पंजाबी कुटुंबात झाला. हा भाग फाळणीच्या वेळी पश्चिम पंजाबमधील झांग प्रांतातून दिल्लीत स्थलांतरित झाला होता. त्याचे वडील चंद्रभान कुमार दुआ यांचे ज्यूसचे दुकान होते.
अगदी लहान वयातच गुलशन कुमार वडिलांना ज्यूसच्या दुकानात मदत करू लागले. त्यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती.
गुलशन कुमार यांनी स्वस्त गाण्यांच्या कॅसेटचे दुकान उघडले होते. जेव्हा व्यवसाय वाढू लागला तेव्हा त्यांनी नोएडामध्ये सुपर कॅसेट्स इंडस्ट्री ही म्युझिक कंपनी सुरू केली. 1983 ला त्यांनी मुंबईत टी सीरीज नावाची कंपनी उघडली होती.
वैष्णोदेवीचे निस्सीम भक्त
गुलशन कुमार हे भगवान शिव आणि माता वैष्णो देवांचे निस्सीम भक्त होते. त्यांच्या टी-सिरीज म्युझिक कंपनी अंतर्गत अनेक धार्मिक भजने आणि आरत्या प्रसिद्ध केल्या आहेत.
इतकंच नाही तर गुलशन कुमार जम्मूमध्ये असलेल्या वैष्णो देवी मंदिरात भंडाराही लावायचे. यामध्ये ते भाविकांना प्रसाद देत असत.
1983 मध्ये त्यांनी वैष्णोदेवीच्या बाण गंगा येथे भंडाराची सुरुवात केली. गुलशन कुमार यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा भूषण कुमार आजही वडिलांच्या स्मरणार्थ हा भंडारा चालवतो.
अंडरवर्ल्ड कडून दुर्दैवी खून
गुलशन कुमार यांची 12 ऑगस्ट 1997 रोजी मंदिराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गुलशन कुमार दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर पडत असताना गोळीबार करणाऱ्याने त्यांच्यावर 16 गोळ्या झाडल्या.
गुलशन कुमार यांच्या हत्येमागे अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमचा हात होता. गुलशन कुमार यांच्यावर रऊफ मर्चंटने गोळीबार केला होता.
2002 मध्ये सेशन्स कोर्टाने मर्चंटला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. गुलशन कुमार यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा भूषण कुमारने टी सिरीजचं साम्राज्य वाढवलं.
गुलशन कुमार यांच्या आयुष्यावर आधारित मोगूल हा बॉलिवूड सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.