तुझे असले धंदे.. 'रोडीज'च्या ट्रान्सजेंडर स्पर्धकासोबत ढाब्याच्या मालकाने केलं गैरवर्तन, काय झालं नेमकं?| Neerja Punia

रोडीजच्या ट्रान्सजेंडर स्पर्धकासोबत गैरवर्तन घडल्याचं उघडकीस आलंय
Dhaba owner misbehaves with 'Roadies' transgender contestant neerja punia
Dhaba owner misbehaves with 'Roadies' transgender contestant neerja punia SAKAL
Updated on

Neerja Punia News: रोडीज या लोकप्रिय शोमधील ट्रान्सजेंडर सदस्यावर खुलेआम गैरवर्तन घडल्याची धक्कादायक गोष्ट घडल्याचं उघडकीस आलंय

रोडीज मधील ट्रान्सजेंडर सदस्य नीरजा पुनिया तिच्या आवडत्या ढाब्यावर गेली असता तिला अडवण्यात आलं आणि तिच्यासोबत गैरवर्तन झाल्याचं उघडकीस आलंय.

Dhaba owner misbehaves with 'Roadies' transgender contestant neerja punia
Shreyas Talpade: श्रेयस तळपदेने केली त्याच्या नवीन सिनेमाची घोषणा, माजी मुख्यमंत्र्यांची पत्नी झळकणार

नीरजा पुनिया ही हरियाणाची असून ती व्यवसायाने मॉडेल आहे. नीरजा म्हणाली, “श्री राम ढाबा हे माझे आवडते ठिकाण आहे. याच ठिकाणी मी अनेकदा चहा घ्यायला जातो. मात्र, त्या रात्री (६ नोव्हेंबर) व्यवस्थापकाने मला ढाब्यात जाण्यापासून रोखले."

नीरजा पुनिया पुढे म्हणाली, "मॅनेजरने मला सांगितले, 'नीरजा बाहेर या, मालकाला तुमच्याशी बोलायचंय.' मी त्याला विचारले की त्याला कशाबद्दल बोलायचे आहे. तर मालक म्हणाला, "इथे येऊन धंदे करू नकोस आणि इथे येणे बंद कर"

मी खुप दिवसांपासुन या ढाब्यावर येते पण पहिल्यांदाच माझ्यासोबत असं गैरवर्तन घडलं, असं नीरजा म्हणाली. (Latest Marathi News)

Dhaba owner misbehaves with 'Roadies' transgender contestant neerja punia
Mousumi Nayak: प्रसिद्ध अभिनेत्री मौसमी नायकला अटक, समोर आलं धक्कादायक कारण

या घटनेबद्दल पुढे बोलताना नीरजा म्हणाली, "मालकाला वाटले की मी ढाब्यावर काहीतरी चुकीचं काम करतेय. पुढे मालकाने, निघून जा इथून असं मला ओरडून सांगितलं."

नीरजाने ढाब्याच्या मालकाला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र ही सगळी घटना घडत असताना कोणीही काहीही बोलले नाही, कारण हॉटेलमधील इतर कर्मचारी नोकरीच्या भीतीने गप्प बसले होते.

नीरजाने ढाब्याच्या मालकाविरुद्ध छळवणुकीचा आरोप केलाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.