Dhishkyaoon Movie: 'तुम्हाला गौतमी नाचलेली चालते पण माझा चित्रपट',‘ढिशक्यांव’चा निर्माता भडकला..

Dhishkyaoon Controversy:
Dhishkyaoon Controversy: Esakal
Updated on

Dhishkyaoon Controversy: मराठी मनोरंजन विश्वाचा सध्या एकापेक्षा एक धडाकेबाज चित्रपट येत आहे. 'वेड' ,'वाळवी' त्याचबरोबर 'ढिशक्यांव' हा चित्रपट देखील चर्चेत आहे. 'ढिशक्यांव' या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रितम एस के पाटील यांनी तर अहेमद देशमुख , उमेश विठ्ठल मोहळकर आणि प्रितम एस के पाटील हे या चित्रपटाचे निर्मिते आहेत.

Dhishkyaoon Controversy:
Urfi Javed: 'विचार काय हाय तुमचा...' उर्फीनं व्हिडिओ शेअर करत दिलं व्हॅलेंटाईनचं भन्नाट गिफ्ट

'ढिशक्यांव' चित्रपटांच्या गाण्याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत. १० फेब्रुवारीला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर यास प्रेक्षकांची समिंश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.हा चित्रपट अडल्ट असल्याचं काहींनी या चित्रपटाला ट्रोलही केलं आहे.

Dhishkyaoon Controversy:
Valentine 2023: 'भला है बुरा..', रिचानं अलीची इज्जतच काढली! व्हिडिओ पाहून हसू नाय आवरणार

याबद्दल चित्रपटाचा निर्माता आणि मुख्य अभिनेता अहेमद देशमुख याला प्रश्न विचारला गेला. तेव्हा त्याने दिलेल्या उत्तरांची सध्या सोशल मिडियावर चर्चा सुरु आहे. चित्रपटावर होत असलेल्या टिकेबद्दल बोलतांना चित्रपटाचा अहेमद म्हणाला की, ‘ ज्यांना असं वाटतयं की त्यांनी चित्रपटाच्या थेटर बाहेर जावून प्रेक्षकांचे रिव्हू घ्यावं' असा सल्ला दिला.

पुढे तो म्हणाला की, मराठी चित्रपट महाराष्ट्रात नाही दाखवायचा मग कुठे चालतो का तुम्हाला. या चित्रपटाला जर अडल्ट म्हणत असाल तर हिदीं चित्रपटातील नंगानाच तुम्हाला चालतोय? गौतमी पाटील नाचलेली चालतेय तुम्हाला? मराठवाड्यातील एका शेतकऱ्याच्या मुलाने हा चित्रपट बनवलेला चित्रपट तुम्हाला का चालत नाही. असं म्हणतं अहेमद देशमुख संताप व्यक्त केला आहे.

Dhishkyaoon Controversy:
Valentine Day 2023: 'और प्यार हो गया'! सिनेमाच्या सेटवरचं जुळल्या रेशीम गाठी...

चित्रपटावर टिका करणाऱ्यांवर अहेमद चांगलाच भडकलेला दिसतोय. त्याने गौतमी पाटील आणि हिदीं सिनेमांच उदाहरण देत त्याची बाजू मांडली आहे. इतकच नाही तर जर 'ढिशक्यांव' चित्रपटात अडल्ट सीन असेल तर मी आताच्या आता हा सिनेमा खाली उतरवायला लावतो. असंही तो म्हणाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.